शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नियम तोडणाऱ्यांना २ कोटीचा दंड; तरीही नागरिक रस्त्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:21 IST

अहमदनगर : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी नगर जिल्ह्यात १ लाख ७ हजार ८२३ ...

अहमदनगर : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी नगर जिल्ह्यात १ लाख ७ हजार ८२३ केसेस करत तब्बल २ कोटी १२ लाख ३९ हजार २८९ रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असतानाही काही बेफिकीर नागरिक आजही नियमांचे उल्लंघन करत कोरोनाला आमंत्रण देताना दिसत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाने मार्चपासून ‘ब्रेक द चैन’ची घोषणा करत कडक निर्बंध लागू केले आहेत. पोलिसांनीही नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करत १ मार्च ते ४ मे या दोनच महिन्यांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल १ कोटी ४४ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. घराबाहेर पडल्यानंतर मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनाकारण बाहेर फिरणे, नियमांचे उल्लंघन करून रेस्टॉरंट, बार, दुकाने सुरू ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई पोलिसांकडून झाली आहे. पोलिसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी सुरू असली तरी अनेक बेफिकीर नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येतात, गर्दी करतात. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत.

.........

...अशी झाली दंडात्मक कारवाई

विनामास्क फिरणे

केस- ८६,२५४ दंड- १,४७,५६,५००

सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन

केस- ४,०५९ दंड- १४,१६,२००

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे-

केस- ४,४५७ दंड- ९,२०,०००

रेस्टॉरंट, बार सुरू ठेवणे

केस- ६ दंड- २४,०००

दुकाने सुरू ठेवणे-

केस- २९९ दंड- ३,९०,५००

मंगल कार्यालयात गर्दी करणे

केस- २८ दंड- २,६५,०००

वाहनांवरील कारवाई-

केस- १२,७२९ दंड- ३४,६७,०९०

...............

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लागू करण्यात आलेल्या नियमांची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरू आहे. नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाभरात पोलीस स्टेशनस्तरावर विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे.

-राजेंद्र पाटील, निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा

........

चारच दिवसांत साडेपाच हजार जणांवर कारवाई

१ ते ४ मे या चार दिवसांत पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ हजार ५३८ जणांवर कारवाई करत १८ लाखांचा दंड वसूल केला आहे.