अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे १२०० रेमडेसिविर इंजेक्शन मंगळवारी दिवसभरात उपलब्ध झाले आहेत. हे इंजेक्शन कोविड रुग्णांलयांना वितरित करण्यात आले आहे.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. गेल्या दोन दिवसात पाच हजार इंजेक्शनची मागणी प्रशासनाकडे नोंदविण्यात आली होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. मंगळवारी दिवसभरात ८०० व नंतर ४०० असे १२०० रेमडेसिविर उपलब्ध झाले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असला तरी सर्व रुग्णालयांना कमी-अधिक प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करू देण्यात आले आहेत. रेमडेसिविरची मागणी नोंदविण्यात आली असून, उद्या बुधवारीही काही रेमडेसिविर उपलब्ध होतील.
......
रेमडेसिविरचे १२०० इंजेक्शन मंगळवारी दिवसभरात उपलब्ध झालेले आहे. यापैकी ८०० रेमडेसिविर कंपनीने कोविड रुग्णालयांना पोहोच केलेले आहेत. पुरवठादारांकडे ४०० उपलब्ध झाले असून, तेही वितरित करण्यात आले आहेत.
-पी.एन. कातकडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन