शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मुळा कारखान्याचे १२ लाख ९३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:22 IST

नेवासा : मुळा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्‍या हंगामात १२ लाख ९३ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. मंगळवारी ...

नेवासा : मुळा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्‍या हंगामात १२ लाख ९३ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. मंगळवारी गळीत हंगामाची सांगता करण्‍यात आली.

कोरोनाच्‍या काळातील सर्व बंधने पाळून कारखान्‍याचे चीफ इंजिनिअर मुकुंद ठोंबरे व मुख्‍य शेतकी अधिकारी विजय फाटके यांच्‍या हस्‍ते पूजा करण्यात आली. यावेळी कारखान्‍याचे अध्‍यक्ष नानासाहेब तुवर, संचालक बाबूराव चौधरी, बाळासाहेब बनकर, बबनराव दरंदले, कार्यकारी संचालक शरद बेल्‍हेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

धरणातील पाण्‍याचा पुरेसा साठा व पाऊसमान व्‍यवस्थित झाल्‍याने कार्यक्षेत्रात उसाचे उत्‍पादन मोठ्या प्रमाणावर वाढले होते. उसाचे विक्रमी उत्‍पादन झाले होते. मागच्‍या वर्षी मशिनरीत काही तांत्रिक सुधारणा केल्‍यामुळे यंदाच्‍या हंगामात रोज आठ ते साडेआठ हजार मे. टन क्षमतेने गळीत घेऊन कारखाना चालविला. कारखान्‍याचा गळीत हंगाम सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्‍यंत सुरळीतपणे चालविला. यंदा उसाचे सर्वाधिक गळीत झाल्याची माहिती अध्‍यक्ष तुवर यांनी दिली.

सर्व उसाचे गाळप केल्‍याशिवाय कारखान्‍याचा गळीत हंगाम बंद केला जाणार नाही, असा शब्द मंत्री शंकरराव गडाख यांनी दिला होता. तो शब्‍द पाळला व सर्व उसाचे विक्रमी गाळप केल्‍यावरच कारखान्‍याच्‍या गळीत हंगामाची सांगता केल्‍याचे तुवर यांनी सांगितले.

तसेच ६० लाख लिटर अल्‍कोहोलची निर्मिती करण्‍यात आली. त्‍यापैकी ५० लाख लिटर अल्‍कोहोल बनविण्‍यासाठी शासनाच्‍या आवाहनाला प्रतिसाद देऊन बी-हेवी मोलॅसेसचा कच्‍चामाल म्‍हणून वापर करण्‍यात आला. त्‍याव्‍यतिरिक्‍त आणखी ५० हजार टन बी-हेवी मोलॅसेसची थेट विक्री करण्‍यात आली. कारखान्‍याच्‍या वीज प्रकल्‍पातही एकूण ३९ कोटी रुपयांची वीजनिर्मिती करण्‍यात आली. त्‍यापैकी कारखान्‍याच्‍या विविध प्रकल्‍पांसाठी विजेचा वापर करून जवळपास २३ कोटी रुपयांची वीज महावितरणला विक्री करण्‍यात आली आहे.