शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

नेवाशात विद्युत पुरवठ्यासाठी १ कोटी खर्चास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:28 IST

नेवासा : शहरातील गावठाण हद्दीतील अनेक रोहित्रांवरील वाढलेला लोड, रोहित्र जळण्‍याचे वाढलेले प्रमाण, त्‍यातून निर्माण होत असलेल्‍या समस्‍या, काही ...

नेवासा : शहरातील गावठाण हद्दीतील अनेक रोहित्रांवरील वाढलेला लोड, रोहित्र जळण्‍याचे वाढलेले प्रमाण, त्‍यातून निर्माण होत असलेल्‍या समस्‍या, काही गावातील वाड्यावस्‍त्‍यांवरील नवीन रोहित्रांची गरज, वीज जोडणीत असलेल्‍या अडचणी निवारण करून गावठाण हद्दीतील विद्यु‍त पुरवठ्यात सुधारणा करण्‍यासाठी १ कोटी रुपयांच्या निधीला मान्‍यता मिळाली आहे. यासाठी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पाठपुरावा केला.

चांदा येथील चांगदेव दहातोंडे रोहित्र, शास्‍त्रीनगर, खडकवाडी गावठाण, मुरगे वस्‍ती, भालके वस्‍ती, प्राथमिक आरोग्‍य केंद्र येथील ६ रोहित्रांचा समावेश आहे. माका येथील सरपंच वस्‍ती, कोकाटे वस्‍तीवर याप्रमाणे २ आणि मुकिंदपूर जावळे रोहित्र १ अशा एकूण ९ रोहित्रांच्‍या क्षमता वाढीला मंजुरी देण्‍यात आली आहे. काही रोहित्रांची क्षमता २५ वरून ६३ केव्‍हीए तर काही रोहित्रांची क्षमता १०० वरून २०० केव्हीएपर्यंत वाढवली जाणार असल्‍याचे मंत्री गडाख यांनी सांगितले.

तसेच जळके खुर्द (चिमणेमळा), हंडीनिमगाव (साळुंके रोहित्र), नेवासे बु. (नारायण गिरी प्रतिष्‍ठान), सौंदाळे (बाबा आरगडे वस्‍ती), तामसवाडी (चोपडेवस्‍ती), बहिरवाडी (कालभैरवनाथ), जेऊर हैबती (सरोदे वस्‍ती), देडगाव (गोयकर व देवकाते वस्‍ती), मक्‍तापूर घुले आदी ठिकाणी नवीन रोहित्रांना मंजुरी देण्‍यात आली आहे.