शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘दृष्टी तशी सृष्टी’प्रमाणेच आशादायक चित्रं पाहायला काय हरकत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 19:01 IST

‘झाडातला माणूस’ नावाची गोष्ट स्वामी विवेकानंद अनेकवेळा सांगत.

- रमेश सप्रे‘झाडातला माणूस’ नावाची गोष्ट स्वामी विवेकानंद अनेकवेळा सांगत. वरवर साध्या वाटणा-या या गोष्टीत खूप अर्थ लपलेला असे. गोष्ट अशी- संध्याकाळची वेळ. धूसर प्रकाश. दूर अंतरावरच्या गोष्टी स्पष्ट दिसत नव्हत्या. नुसती त्यांच्या आकाराची रूपरेषा दिसत होती. एका बागेच्या दुस-या टोकाला एक माणूस उभा होता. आपल्या छातीशी एक गाठोडं घट्ट धरून एकजण वेगात पळत बागेत आला. बागेच्या त्या कोप-यात उभ्या असलेल्या त्या माणसाला त्यानं पाहिलं आणि जिवाच्या आकांतानं तो दुस-या दिशेने पळून गेला.काही वेळानं एक तरुणी तिथं आली, त्या दूर उभ्या असलेल्या माणसाकडे लक्ष जाताच तिनं मनगटातल्या घड्याळाकडे पाहिलं अन् त्या माणसाच्या दिशेनं झपझप पावलं टाकत गेली. तिथं पोहोचल्यावर काही वेळ रेंगाळली. नंतर संथगतीनं तिथून दूर गेली. नंतर तिथं एक भगवी कफनी घातलेले, हातात कमंडलू घेतलेले एक साधूबुवा आले, त्यांनीही दूरवरून त्या बागेच्या कोप-यात उभ्या असलेल्या माणसाकडे पाहिलं. ते शांतपणे त्या माणसाजवळ गेले. इकडे तिकडे पाहून सावकाश तिथं बसले नि ध्यानस्थ झाले. ही सारी दृष्यं पाहणारे एक आजोबा बाकावर बसले होते. त्यांनाही तो दूरचा माणूस दिसत होता; पण या तीन व्यक्तींच्या तीन वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहून ते उठले नि स्वत: त्या माणसाच्या दिशेनं निघाले. कुतूहलानं पाहतात तो त्यांना दिसलं की प्रत्यक्षात तो माणूस नसून हुबेहूब माणसासारखा दिसणारा झाडाचा बुंधा होता. विचार करू लागल्यावर आजोबांच्या लक्षात सारा प्रकार आला.पहिली व्यक्ती चोर असावी. चोरीच्या मालाचं गाठोडं छातीशी धरून पळताना त्याला ती माणसासारखी दिसणारी आकृती पोलीस वाटली म्हणून विरुद्ध दिशेनं तो वेगात पळून गेला. दुसरी तरुणी ही प्रेमात पडलेली असावी. आपला प्रियकर आपल्या आधी पोचलाय हे पाहून ती वेगानं त्या दिशेनं गेली नि तो माणूस नसून झाडाचा बुंधा आहे हे लक्षात येताच काही वेळ थांबून निघून गेली. तिसरे साधुबुवा मात्र शांतपणे त्या माणसाच्या दिशेनं गेले. ते एक झाड आहे हे लक्षात येताच आनंदानं तिथं बसून त्यांनी आपली सायंउपासना सुरू केली.हे सांगून, स्वामी विवेकानंद विचारत - हे असं का झालं? माणसासारखी आकृती असलेला तो झाडाचा बुंधा होता. धुसर प्रकाशामुळे त्या आकृतीत माणूस दिसला इथर्पयत ठीक होतं पण त्या चोराला त्यात पोलीस दिसणं, त्या तरुणीला त्यात आपला प्रियकर दिसणं विशेष होतं. साधूला तो माणूस असला तरी हरकत नव्हती. बागेच्या कोप-यात बसून त्यांना सायंउपासना करायची होती. असे भास आपल्याला नित्य होत असतात. ‘दिसतं तसं नसतं’ याचा अनेकदा अनुभव येऊनही आपण आपल्या मनातले विचार, कल्पना, तर्क, पूर्वग्रह बाहेरची परिस्थिती, इतर व्यक्ती, त्यांचं वर्तन यांच्यावर लादून त्यांचा अर्थ लावायचा प्रय} करतो. वाईट म्हणजे आपण आपल्या प्रतिक्रिया त्यानुसार व्यक्त करतो. अन् मनात, जनात, जीवनात गैरसमज, संघर्ष, दु:ख, ताणतणाव गरज नसताना निर्माण करतो. विशेष म्हणजे त्यावर आधारीत आपलं वागणं अतिशय आग्रही, संकुचित, आत्मकेंद्री असतं.एक गमतीदार गोष्ट सांगितली जाते, समर्थ रामदास रामायण सांगत असतात. एक वृद्ध व्यक्ती अतिशय तन्मय होऊन कथा ऐकत असते. ज्या दिवशी अशोकवनातील सीतेची अवस्था पाहून रागानं लालेलाल होऊन हनुमान अशोकवनाचा विध्वंस करतो हे कथानक रंगवून सांगितलं गेलं त्या दिवशी ती वृद्ध व्यक्ती समर्थ रामदासांना म्हणाली, ‘अप्रतिम कथा सांगितलीस; पण एक चूक झाली. अशोक वनातील फुलं पांढरी नव्हती तर तांबडी होती.’ समर्थ म्हणाले, ‘नाही, पांढरीच होती.’ दोघांचा वाद श्रीरामांसमोर गेला. श्रीराम म्हणाले, ‘दोघंही बरोबर  आहात. ती फुलं पांढरी शुभ्रच होती; पण हनुमंताचे डोळे रागानं लाल झाल्यामुळे त्याला ती तांबडी दिसली.’किती खरंच आहे! कावीळ झालेल्या व्यक्तीला सा-या गोष्टी पिवळ्या दिसतात. इतकंच काय पण आपण आपल्या डोळ्यावरच्या चष्म्याचा रंग बदलला की बाहेरच्या सगळ्या वस्तू आपल्याला त्या त्या रंगाच्या दिसू लागतात. रस्त्यावरील खांबाला लटकलेल्या पतंगात त्याच्या आकारामुळे नि खाली लोंबणा-या कागदाच्या झिरमिळ्यामुळे लहान मुलांना लांब दाढी असलेलं भूत दिसतं नि ती घाबरतात. अंगणात वाळत घातलेली बाबांची पॅँट नि सदरा आणायला रात्रीच्या अंधारात सदू घाबरतो. कारण त्यात हलणा-या पँटचे पाय नि सद-याचे हात पाहून त्याला भुताचा भास होतो. हातात टॉर्च दिल्यावर त्याच्या प्रकाशात त्याच्या मनातलं भूत जातं नि कपडे दिसतात.अशी भुतं मनातच असतात. आपण त्यांना बाहेरच्या वस्तूंवर पाहतो नि भितो. भविष्यात घडणा-या घटना आपल्याला आज दिसत नाहीत. आपण चिंता, भय, काळजी, अशा नकारात्मक कल्पना करून आज उगीचच धास्तावतो. यामुळे आपला आज, म्हणजेच आपला वर्तमानकाळ आपण नासवतो. कारण नसताना दु:खी उदास बनतो. ‘दृष्टी तशी सृष्टी’ हे जर खरं आहे तर आपण सदैव सकारात्मक, आशादायक चित्रं पाहायला काय हरकत आहे? भविष्यात उज्ज्वल चित्रं पाहण्याचा संकल्प आत्ताच करू या.