- मकरंद सरदेशमुख
- घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्ज-बाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात.
- नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहुन घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते.
- नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी.
- नवीन घर घेताना दक्षिण ,पश्चिम ,नैऋत्य आणि आग्नेय या दिशातुन येणारे दरवाजे टाळावेत.
- भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबु - ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवावा .
- घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ उर्जा भक्कम रहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसविणे महत्वाचे आहे .
- घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले ,पाने ,सुकलेली तोरणे काढून टाकावीत . म्हणजे घरामध्ये शुभ उर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाहीत .
- घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळे ही उत्तर किंवा पुर्व भिंतींवर लावावीत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पुर्व व उत्तर या शुभ दिशांना होते .
- घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतींवर लावावीत म्हणजे कॅलेंडर कडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते .
- कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पुर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते.
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)