शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाते मनी राम चिंतीत जावा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 18:40 IST

संसाराचे चिंतन केल्यास आपल्याला दुःख प्राप्त होईल आणि देवाचे चिंतन केले तर सुख प्राप्त होईल.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांची रचना केली. त्यांनी मनाच्या श्लोकांतून मनाला उपदेश केला. अध्यात्मशास्त्रात मन नावाच्या इंद्रियावरच सगळे अवलंबून आहे. मानवी जीवनाचे अंतीम ध्येय मुक्ती हेच आहे पण प्रश्न असा आहे की, मुक्ती तरी कुणाला..? देहाला का..? आत्म्याला का..? मुक्त व्हावयाचे म्हणजे नेमके कशापासून मुक्त व्हावयाचे..? देहापासून तर सगळेच मुक्त होतात. आत्मा तर नित्यच मुक्त आहे कारण ते ईश्वरी चैतन्य आहे मग मुक्ती कुणाला..? तर ज्या वासनेमुळे पुन्हा पुन्हा अनेक देहांत जन्माला यावे लागते त्या वासनेपासून मुक्ती अभिप्रेत आहे कारण जन्म मरणाला कारण वासनाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात -

जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ।तोचि होय अंगे हरिरुप ॥

वासनेला कारण काय तर मन..! म्हणून श्रीसमर्थ मनाला उपदेश करतात, प्रभाते मनी राम चिंतीत जावा..!आता मन म्हणजे तरी काय..? शास्त्रकार सांगतात -

संकल्प विकल्पात्मकं मनः..!

संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन..! अंतःकरणाचे चार भाग असतात.१.मन२.बुद्धी३.चित्त४.अहंकार

संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन.!निर्णयात्मक भूमिका घेणारी वृत्ती म्हणजे बुद्धी.!चिंतन करणारी चित्त.!आणिअहंभावात्मक वृत्ती म्हणजे अहंकार.!

एखाद्या विषयाचे सतत अनुसंधान असणे याला चिंतन असे म्हणतात. मनुष्य सतत कशाचे तरी चिंतन करीतच असतो. चिंतनाशिवाय तो राहूच शकत नाही पण चिंतन तरी कुणाचे करावे..? आत्मवस्तूचे की अनात्म वस्तूचे..? चिंतनाचा परिणाम सांगतांना शास्त्रकार सांगतात - 

चिंतने चिंतने तद्रूपता..!

आपण ज्याचे चिंतन करु त्याचं स्वरुप आपल्याला प्राप्त होते. मग चिंतन कुणाचं करावे..? जर संसाराचे चिंतन केले तर संसाराचे स्वरुप आपल्याला प्राप्त होईल आणि देवाचे चिंतन केलं तर देवाचे स्वरुप प्राप्त होईल. आता संसाराचे स्वरुप कोणतं आहे. तुकाराम महाराज म्हणतात -

दुःख बांदवडी आहे हा संसार ।सुखाचा विचार नाही कोठे ॥

संसाराचे चिंतन केल्यास आपल्याला दुःख प्राप्त होईल आणि देवाचे चिंतन केले तर सुख प्राप्त होईल. म्हणून श्रीसमर्थ या मनाला उपदेश करतात -हे मना..! प्रभाते मनी राम चिंतीत जावा..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणभाष - ८३२९८७८४६७ ) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक