जीपच्या धडकेत दोन युवक ठार
By Admin | Updated: July 20, 2014 00:35 IST2014-07-20T00:35:48+5:302014-07-20T00:35:48+5:30
मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार

जीपच्या धडकेत दोन युवक ठार
सोलापूर : भरधाव वेगात निघालेल्या क्रुझर या ट्रॅक्सची जोरदार धडक बसल्याने मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. पुणे महामार्गावरील बाळेनजीक असलेल्या बालाजी हार्डवेअरसमोर शनिवारी मध्यरात्री म्हणजे साडेबारा वाजता हा अपघात घडला.
अतुल शशिकांत गंभीरे (वय-३०, रा. आसरा हौसिंग सोसायटी, सोलापूर) आणि गणेश नेताजी सुरवसे (वय-३२, रा. कल्याणनगर, दत्त मंदिरामागे, जुळे सोलापूर) अशी जागीच मरण पावलेल्यांची नावे आहेत. हे दोघे एमएच-१३/एआर-५९१६ या मोटरसायकलवरून जेवण करण्यासाठी पुणे रोडवरील एका हॉटेलात गेले होते. जेवण आटोपून घराकडे परतत असताना बाळेनजीक मोटरसायकलला समोरून येणाऱ्या ट्रॅक्सने (एमएच-१३/एझेड-७८३५) जोरदार धडक दिली. त्यात दोघे जागीच ठार झाले. अमित शशिकांत गंभीरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्सचालकावर फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तपास सपोनि साळुंखे करीत आहेत. मृत गणेश सुरवसे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तर अतुल गंभीरे याच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. --------------------------
जेवण जीवावर बेतले !
दोघे मोटरसायकलवरून पुणे महामार्गावरील एका हॉटेलात जेवायला गेले. महामार्गावरील जडवाहनांचा अंदाज न आल्याने अपघात झाला.