गँस दरवाढीच्या विरोधात कुडाळात शिवसेनेची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 18:14 IST2017-10-01T18:10:30+5:302017-10-01T18:14:24+5:30
मोदी सरकार हाय हाय, या सरकारचे करायचे काय?, गॅस दरवाढीचा निषेध असो अशा सरकार विरोधात घोषणाबाजी करीत कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात सरकारचा निषेध केला.

गँस दरवाढीच्या विरोधात कुडाळात शिवसेनेची घोषणाबाजी
कुडाळ दि. १ : मोदी सरकार हाय हाय, या सरकारचे करायचे काय?, गॅस दरवाढीचा निषेध असो अशा सरकार विरोधात घोषणाबाजी करीत कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात सरकारचा निषेध केला.
गेल्या काही दिवसात सत्तेत असलेल्या शिवसेनेने सरकारच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यामध्ये, प्रमुख शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने छेडली असुन रविवारी सकाळी कुडाळ शिवसेना शाखा येथे कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने गॅस दर वाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने सरकारचा निषेध करीत आंदोलन छेडले. यावेळी मोदी सरकार हाय हाय अशा सरकार विरोधी घोषणा दिल्या.
या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, जिल्हापरिषद सदस्य अमरसेन सावंत, माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, संतोष शिरसाट, युवासेनेचे सुशील चिंदरकर, सतीश कुडाळकर, अर्चना तायशेट्ये तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने वाढती महागाई न रोखल्यास येत्या काही दिवसात तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा अभय शिरसाट यांनी यावेळी बोलताना दिला.