कणकवलीत चार डेंग्यू पॉझिटिव्ह
By Admin | Updated: September 20, 2015 00:02 IST2015-09-19T23:48:18+5:302015-09-20T00:02:49+5:30
कलमठ, बोर्डवे, कळसुली गावातील रुग्णांचा समावेश

कणकवलीत चार डेंग्यू पॉझिटिव्ह
कणकवली : ताप येत असल्याने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या चार रूग्णांचे रक्तनमुने डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत. श्रेयस शरद मराठे (वय १९), एकनाथ पंडीत शिंदे (वय १९, बोर्डवे, खुटवळवाडी), नितीन दत्ताराम मुसळे (वय ३३, कलमठ, कोष्टीआळी) आणि कृष्णनाथ गोसावी (वय ६०, रा.कळसुली, सांद्रेवाडी) अशी या रूग्णांची नावे आहेत. या सर्व रूग्णांवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
तापसरी आठवडाभरात आटोक्यात येणार असल्याचे यंत्रणेकडून सांगितले जात असले तरी तापसरीच्या रूग्णांची संख्या वाढती आहे. यामध्ये मुंबईहून आलेल्या रूग्णांची संख्या मोठी आहे.
तापसरीची साथ आटोक्यात आली असे वाटत असतानाच पावसाने पुन्हा जोरात आगमन केल्याने तापाचे रूग्ण वाढत आहेत.
गेले दोन दिवस कणकवली येथील उपजिल्हा रूग्णालयात सुमारे ३०० रूग्ण बाह्य रूग्ण विभागात तपासणीसाठी आले होते. डेंग्यु, मलेरियाचे रूग्ण आढळत असल्याने अद्यापही तापसरीचा धोका पूर्णत: टळलेला नसल्याचे चित्र
दिसत आहे. (प्रतिनिधी)