आंबोलीत धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी, रविवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता, पोलिस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 17:23 IST2018-07-17T17:21:14+5:302018-07-17T17:23:13+5:30
आंबोलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. पूर्ण क्षमतेने वाहू लागलेल्या धबधब्यांच्या पाण्यात आंघोळ करण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. रविवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने शंभर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती.

आंबोली येथे धबधब्यावर पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला.
आंबोली : आंबोलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. पूर्ण क्षमतेने वाहू लागलेल्या धबधब्यांच्या पाण्यात आंघोळ करण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. रविवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने शंभर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती.
आंबोलीतील धबधबे गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने वाहू लागले असून, पर्यटक आंबोलीकडे वळू लागले आहेत. गेल्या दोन रविवारी अजिबात गर्दी नसल्याने पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.
या रविवारी मात्र प्रचंड गर्दी झाली होती. जवळपास तीस हजार पर्यटकांनी आंबोलीत हजेरी लावल्याने व्यावसायिकांची सुगी झाली. पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार अथवा वाहतुकीची कोंडी झाली नाही. जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली या ठिकाणांहून मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले होते.