एअरफोर्स पोलिसांकडून युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 15:09 IST2018-04-19T15:09:21+5:302018-04-19T15:09:21+5:30
पीडित युवती १५ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत घरी जात असताना एअरफोर्स पोलिसांनी त्यांना वाहन तपासणीसाठी थांबविले. एअरफोर्स जवान प्रशांत भोले याने पीडित युवतीच्या मित्राला मारण्याची धमकी देत तिच्या अंगाला स्पर्श करत छेडछाड केली.

एअरफोर्स पोलिसांकडून युवतीचा विनयभंग
विमाननगर: गस्तीवर असणाऱ्या एअरफोर्स पोलिसानेच वाहन तपासणीच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बुधवारी प्रशांत भोले या एअरफोर्स जवानाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती ही १५ एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत घरी जात असताना एअरफोर्स पोलिसांनी त्यांना वाहन तपासणीसाठी थांबविले. एअरफोर्स जवान प्रशांत भोले याने पीडित युवतीच्या मित्राला मारण्याची धमकी देत तिच्या अंगाला हात लाऊन छेडछाड केली . त्यानंतर एअरफोर्स पोलिसांनी त्यांची गाडी लोहगाव येथील कलवड वस्ती खाणीजवळ नेऊन पीडित युवतीच्या शेजारी बसून तिच्याशी अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून एअरफोर्स जवान भोले याच्याविरुद्ध विमानतळ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सी.एस. चौधरी करीत आहेत.