फ्लिपकार्ट आणि शॉप क्लूजवर डिसकाऊंटचा धमाका
By Admin | Updated: June 10, 2017 17:31 IST2017-06-10T17:31:59+5:302017-06-10T17:31:59+5:30
फ्लिपकार्ट आणि शॉप क्लूज या दोन शॉपिंग वेबसाइट्सने ग्राहकांसाठी बंपर सेल ठेवला आहे. "

फ्लिपकार्ट आणि शॉप क्लूजवर डिसकाऊंटचा धमाका
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10- पावसाळ्याला आता सुरूवात होते आहे. विशेष म्हणजे शाळा-कॉलेजसुद्धा काही दिवसात सुरू होतील. त्यासाठी अर्थातच सगळ्यांना शॉपिंग करणं महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना भरपूर शॉपिंग करता यावी, यासाठी फ्लिपकार्ट आणि शॉप क्लूज या दोन शॉपिंग वेबसाइट्सने ग्राहकांसाठी बंपर सेल ठेवला आहे. "एचडीएफसी" बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड धारकांना तर त्यात आणखी १० टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
"फ्लिपकार्ट"ने फॅशन आणि इतर वस्तूंवर ५० टक्क्यांहून अधिक सूट दिली असून पुढचे ९ दिवस ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे. "शॉपक्लूज"च्या सवलती पुढील आठवडा भर असणार आहे. यात होम, किचन, इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन प्रोडक्ट्सवर भरगोस सूट देण्यात आली आहे.
"फ्लिपकार्ट"ने या बंपर ऑफरसह ग्राहकांसाठी "बिड अँड विन" या अनोख्या स्पर्धेचंही आयोजन केलं आहे. यात एखाद्या वस्तूवर सर्वात कमी बोली लावण्याऱ्या ग्राहकाला १३,९९५ रुपये किमतीचं घड्याळ आणि १५ हजार रुपये किमतीची आकर्षक बॅग बक्षिस म्हणून दिली जाणार आहे. फ्लिपकार्ट आणि शॉपक्लूजच्या या ऑफर्सचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे.