पशुधन वाचविण्यासाठी उद्योजक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 07:09 PM2019-04-24T19:09:02+5:302019-04-24T19:10:26+5:30

सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी एकत्रित येत जनावरांसाठी मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ५० उद्योजकांनी एकत्र येऊन सदर उपक्रम हाती घेतला असून, चार गावांमध्ये दोन महिने पशुधनासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Entrepreneurs have come to save livestock | पशुधन वाचविण्यासाठी उद्योजक सरसावले

पशुधन वाचविण्यासाठी उद्योजक सरसावले

Next
ठळक मुद्देसामाजिक जाणीव : ५० उद्योजक चार गावांना देणार सलग दोन महिने टॅँकरने पाणी

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी एकत्रित येत जनावरांसाठी मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ५० उद्योजकांनी एकत्र येऊन सदर उपक्रम हाती घेतला असून, चार गावांमध्ये दोन महिने पशुधनासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दुष्काळात सामाजिक जाणीव लक्षात घेऊन उद्योजकांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ५०हून अधिक टॅँकरद्वारे तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा केला जात आहे. मात्र पशुधनाचे हाल होत आहेत. अशा परिस्थिती उद्योजकांनी पुढे येऊन पशुधनाची तहान भागविण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीला हात पुढे केला आहे. तालुक्यातील देवपूर, पंचाळे, मिठसागरे, खंबाळे या गावांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येक गावाला रोज एक २० हजार लिटरचा टँकर देण्यात येणार आहे. गुरुवारपासून (दि. २५) देवपूर येथून उपक्रमाला सुरुवात होणार आहे.
तथापि, सरकारकडून जनावरांसाठी पाण्याची सुविधा होऊ शकेल असे वाटत नाही.समितीद्वारे जनावरांना पाणी देण्याचे नियोजन आखण्यात आले असून, देवपूर येथे २५ एप्रिलपासून उपक्रमाला सुरुवात होणार आहे. देवपूरसह चार गावांची निवड, प्रत्येक गावाला उद्यापासून रोज एक २० हजार लिटरचा टँकर उद्योजकांची एकजूट निमाचे संचालक राजेश गडाख, मारुती कुलकर्णी, बबन वाजे, किरण वाजे, राहुल नवले, कृष्णा नाईकवाडी, अजय बाहेती, अतुल अग्रवाल यांनी जनावरांसाठी टँकरने मोफत पाणी देण्याची संकल्पना मांडली. यास वसाहतीतील ५०हून अधिक उद्योजकांनी मदत देण्याचे जाहीर केले व निधी जमा केला.












२० हजार लिटरच्या टँकरसाठी २ हजार ८०० खर्च येणार असल्याने उद्योजकांकडून २५० टँकरचा खर्च जमा झाला.

चौकट-
२० हजार लिटर क्षमतेचा टँकर रोज देवपूर, पंचाळे, मिठसागरे, खंबाळे येथील वाड्या-वस्त्यांवर फिरणार आहे. हा भाग बारमाही टंचाईग्रस्त असल्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात पशूपालन केले जाते. दुग्ध व्यवसाय येथील शेतकऱ्यांचे प्रमुख उपजिविकेचे साधन बनला आहे.

फोटो क्र.- टॅँकरचा संग्रहीत फोटो वापरावा, ही विनंती.

Web Title: Entrepreneurs have come to save livestock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.