नागपुरात मिलिटरी स्पेशल ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 15:06 IST2018-11-13T15:06:21+5:302018-11-13T15:06:52+5:30
गुवाहाटी ते आंध्र प्रदेशातील बापटला दरम्यान धावत असलेल्या मिलिटरीच्या स्पेशल रेल्वेगाडीचे तीन डबे मंगळवारी दुपारी १.२५ च्या दरम्यान नागपुरात शिरत असताना गुरुद्वाराजवळ रुळावरून घसरले.

नागपुरात मिलिटरी स्पेशल ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गुवाहाटी ते आंध्र प्रदेशातील बापटला दरम्यान धावत असलेल्या मिलिटरीच्या स्पेशल रेल्वेगाडीचे तीन डबे मंगळवारी दुपारी १.२५ च्या दरम्यान नागपुरात शिरत असताना गुरुद्वाराजवळ रुळावरून घसरले. या अपघातात कुठलीही वित्त वा जिवीतहानी झालेली नाही.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या डी केबिनजवळ ही गाडी येत असतानाच अचानक गाडीचे तीन डबे रुळावरून घसरले. या गाडीत मिलिटरीचे बरेच सामान व काही जवान प्रवास करीत होते. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून गाडीचे डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही गाडी कुठल्या प्रवासी गाड्यांच्या रेल्वेमार्गावर नसल्याने प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक अबाधित राहिले आहे.