जळगाव शहरात मेहुण्याचा शालकावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:19 IST2018-02-24T22:19:30+5:302018-02-24T22:19:30+5:30

तंबाखू मागितल्याचा राग आल्याने गोपाळ अशोक पाटील या चुलत मेहूण्याने शालक राजेश रमेश मोरे (वय १८ रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री हरिविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी शनिवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

A knife attack on Shalwar in Jalgaon city | जळगाव शहरात मेहुण्याचा शालकावर चाकू हल्ला

जळगाव शहरात मेहुण्याचा शालकावर चाकू हल्ला

ठळक मुद्दे हरिविठ्ठल नगरात घडली घटनाजखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२४ : तंबाखू मागितल्याचा राग आल्याने गोपाळ अशोक पाटील या चुलत मेहूण्याने शालक राजेश रमेश मोरे (वय १८ रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री हरिविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी शनिवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजेश मोरे शुक्रवारी रात्री दहा वाजतामावशीच्या घरासमोर थांबलेला असताना तेथे चुलत बहिणीचा पती गोपाळ अशोक पाटील (रा.खंडेराव नगर, जळगाव) हा आला असता त्याला राजेश याने तंबाखू मागितली. त्या कारणावरुन गोपाळ याने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर दुचाकी अडकविण्याच्या किचनमध्ये असलेला लहान चाकू गळ्यावर मारला. यावेळी गोपाळची पत्नी आरती देखील तेथे होती. तिने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता तिलाही गोपाळ ने मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्याने नातेवाईकांनी राजेश याला रात्रीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील यांनी जखमीचा जिल्हा रुग्णालयात जावून जबाब नोंदविला.

Web Title: A knife attack on Shalwar in Jalgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.