उसाच्या वजनावर भरारी पथकाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:43 IST2017-12-15T00:43:24+5:302017-12-15T00:43:37+5:30
साखर कारखान्यामध्ये ऊस नेताना वजन मापामध्ये गडबडी करून तोलाई मारली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले

उसाच्या वजनावर भरारी पथकाची नजर
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : साखर कारखान्यामध्ये ऊस नेताना वजन मापामध्ये गडबडी करून तोलाई मारली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जालना जिल्ह्यात पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक हंगाम सुरूअसलेल्या कारखान्यांतील वजनमापांची तपासणी करणार असून, यात दोषी आढळून आल्यास फौजदारी करण्याचे अधिकार या पथकाला असणार आहेत.
उसाला अधिक भाव देऊन तोलाईत फसवणूक केली जात असल्याच्या विविध शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तालयात केल्या होत्या.
यांचा असेल पथकात समावेश
त्या त्या तालुक्याचे तहसीलदार, संबंधित कारखान्याच्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, औरंगाबादचे प्रादेशिक साखर सहसंचालक आणि वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रकांचा समावेश असेल.