डोनाल्ड ट्रम्प म्हणाले 'व्हाइट हाऊस म्हणजे कचरा'
By Sagar.sirsat | Updated: August 4, 2017 08:58 IST2017-08-04T08:44:43+5:302017-08-04T08:58:43+5:30
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते त्यांच्या अशाच एका विधानामुळे. व्हाइट हाऊस म्हणजे कच-याचा ढिगारा आहे असं ट्रम्प म्हणाल्याचा दावा अमेरिकेच्या मीडियाने केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले 'व्हाइट हाऊस म्हणजे कचरा'
वॉशिंग्टन, दि. 4 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते त्यांच्या अशाच एका विधानामुळे. व्हाइट हाऊस म्हणजे कच-याचा ढिगारा आहे असं ट्रम्प यांनी म्हटल्याचा दावा अमेरिकेच्या मीडियाने केला आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा खोडून काढला आहे.
golf.com ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यू जर्सीच्या बेडमिंस्टर येथे असलेल्या स्वतःच्या एका गोल्फ कोर्स क्लबमध्ये ट्रम्प गेले होते. गोल्फ खेळण्यापूर्वी गोल्फ क्लबच्या सदस्यांसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले, ''मी इकडे वारंवार येतो कारण ,व्हाइट हाऊस म्हणजे कचरा आहे, ती एक गलिच्छ जागा आहे''.
याबाबतचं वृत्त आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टीकेचं लक्ष्य ठरले आहेत. ट्रम्प राष्ट्रपतीपदाचा सन्मान ठेवत नाहीत त्यांनी राष्ट्रपतिपद सोडावं अशी मागणी अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.
दुसरीकडे काल ट्रम्प यांनी ट्विट करून यावर स्पष्टीकरण दिलं . माझं व्हाइट हाऊसवर प्रेम आहे. मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात सुंदर इमारतींपैकी ते एक आहे. मी व्हाइट हाऊसला कचरा म्हणाल्याचं वृत्त धाधांत खोटं आहे, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं.
ट्रम्प यांच्या या ट्विटनंतर golf.com ने आणखी एका वृत्तात ट्रम्प खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. 'ते व्हाइट हाऊसला कचरा म्हणाले त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या जवळपास 8 क्लबच्या सदस्यांनी ते ऐकलं' या आशयाखाली golf.com ने वृत्त प्रकाशीत केलं आहे.
I love the White House, one of the most beautiful buildings (homes) I have ever seen. But Fake News said I called it a dump - TOTALLY UNTRUE
— Donald J. Trump (@realDonaldTrump) August 3, 2017