बँकॉक स्फोट प्रकरण; संशयितांचे ठसे जुळले
By Admin | Updated: September 2, 2015 23:21 IST2015-09-02T23:21:33+5:302015-09-02T23:21:33+5:30
थायलंडमधील इरवान ब्रह्म मंदिरावरील भीषण हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला विदेशी संशयितांच्या बोटांच्या ठशांशी आणि बॉम्ब तयार करणारे स्फोटक पदार्थ

बँकॉक स्फोट प्रकरण; संशयितांचे ठसे जुळले
बँकॉक : थायलंडमधील इरवान ब्रह्म मंदिरावरील भीषण हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला विदेशी संशयितांच्या बोटांच्या ठशांशी आणि बॉम्ब तयार करणारे स्फोटक पदार्थ असलेल्या बाटलीवर आढळले बोटांचे ठसे जुळल्याने या स्फोटाच्या तपासाला गती मिळाली आहे.
या हल्ल्याप्रकरणी मंगळवारी एका संशयिताला कम्बोडिया सीमेलगत अटक करण्यात आली होती. १७ आॅगस्ट रोजीच्या या भीषण हल्ल्यात २१ जण ठार, तर अन्य १०० जण जखमी झाले होते. स्फोटके असलेल्या बाटलीवरील बोटांचे ठसे या संशयितांच्या बोटांच्या ठशांशी जुळले आहेत, असे पोलीस प्रवक्ते प्रावूत थावोर्सिसी यांनी सांगितले.
शनिवारी एका अपार्टमेंटमध्ये टाकण्यात आलेल्या धाडीत स्फोटके असलेली ही बाटली सापडली होती. याच अपार्टमेंटमधून एका विदेशी व्यक्तीला अटकही करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी तुर्कीच्या एका व्यक्तीविरुद्ध या हल्ल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी केले आहे. या नवीन संशयिताचे नाव इम्राह दावुतोग्लू असे आहे. (वृत्तसंस्था)