आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यानेच राजीनामा-पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:50 IST2018-01-07T00:49:29+5:302018-01-07T00:50:11+5:30
संवैधानिक विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझ्या लढवय्या वृत्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा दिला. जनतेचा माझ्यावर असलेल्या विश्वासापोटी,

आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यानेच राजीनामा-पटोले
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : संवैधानिक विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षीत बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझ्या लढवय्या वृत्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा दिला. जनतेचा माझ्यावर असलेल्या विश्वासापोटी, प्रेमापोटी मी कुठेही असलो तरी त्याच जोमाने, ताकदीने आपले कार्य करीत राहील, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार नाना पटोले यांनी केशोरी येथे आयोजित जाहीर सभेत केली.
डॉ. राधाकृष्णन हायस्कूल कनेरीच्या पटांगणावर केशोरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आयोजित जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तालुका काँग़्रेस कमेटीचे उपाध्यक्ष नारायण घाटबांधे, प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भागवत पाटील नाकाडे, दिलीप डोये, राजेश नंदागवळी, रेखा समरीत, प्रमोद लांजेवार, नितीन पुगलिया, पोर्णिमा शहारे, पटले, आशा झिलपे, विशाखा शहारे, हेमंत भांडारकर, माणिक घनाडे, बाबुराव पाटील गहाणे, नरेश पाटील गहाणे, श्रीकांत घाटबांधे, विनोद गहाणे, चेतन शेंडे व हजारोंच्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, केंद्र व राज्य सरकार जाती-जातीत तेढ निर्माण करुन महाराष्ट्र पेटविण्याचे काम करीत आहे. हे थांबविणे अत्यंत गरजेचे आहे.
कोरेगाव भिमा प्रकरणी राज्य शासन दोषी असल्याचे सांगून लोकांमध्ये मत भिन्नता निर्माण करण्याचे विष पेरीत आहे. स्थळांचे संरक्षण करणे ही शासनाची जबवादारी असते.
शेतकºयांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करुन शेतकऱ्यांचे हित जोपासून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमी भाव देणे आवश्यक आहे. जे शासन शेतकरी, गोरगरीबांचा विचार करीत नसेल तर अच्छे दिन येण्याचा विचार करु नका असे ते म्हणाले. सुशिक्षीत बेरोजगारांचा प्रश्न सोडविण्यापेक्षा राजकारण हे व्यवसाय म्हणून करणाऱ्या शासनाला वटणीवर आणणे गरजेचे आहे, असे मत माजी खासदार पटोले यांनी या वेळी व्यक्त केले. तसेच कुठलाही पक्षात असलो तरी शेतकऱ्यांसाठी लढा सुरू राहिल असे सांगितले.