स्पर्धा परीक्षा देताय? ‘प्लॅन बी’ तयार ठेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 16:27 IST2017-08-10T16:26:38+5:302017-08-10T16:27:50+5:30
स्पर्धा परीक्षेत आपल्याला हवं तेच पद मिळेल असं काही नाही, अपयश पचवायची तयारी कुणी करायची?

स्पर्धा परीक्षा देताय? ‘प्लॅन बी’ तयार ठेवा!
- अजय अर्जुन नरळे
स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र म्हणजे एक खूप मोठ जंगलच आहे. या जंगलात जाऊन वाघाची शिकार करणारे खूप कमी. ते जमणारे शिकारीच या जंगलात यशस्वी होतात. खूप मोठी स्वप्न घेऊन विद्यार्थी या जंगलात प्रवेश करतात परंतु त्यापैकी खूपच कमी विद्यार्थी यशस्वी होतात. अपयश पदरी पडलेल्यांकडे नोकरी-व्यवसायाचा दुसरा कोणताच पर्याय नसेल तर पश्याताप करून घेण्याशिवाय हातात काहीच शिल्लक राहत नाही.
सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा परीक्षेतून जेवढी पदे शासन भरते त्याच्या कित्येक पटीने जास्त विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत आहेत. ज्या विध्याथ्र्याना या परीक्षेतून चांगली पदे मिळाली तेच विद्यार्थी सत्कार, भाषण, व्याख्याने या माध्यमातून समाजासमोर येतात व त्यांना मिळणार्या सुविधा व सन्मान याची कल्पना करून बहुतेक विद्यार्थी या क्षेत्नाकडे आकर्षित होतात. परंतु याच क्षेत्नात अपयशी ठरलेल्या विद्याथ्र्याकडे पहायला कुणाला वेळही नसतो. त्यांच्या वाट्याला फक्त उपहास, विटंबना येते, आणि या परिस्थितीत त्यांच्याकडे आर्थिक कमाईचा दुसरा मार्ग नसेल तर त्यांची परिस्थिती ‘ना घर का, ना घाट का’ अशीच होते.
आजच्या तरु णाईने स्पर्धा परीक्षा क्षेत्न हे फक्त सन्मान मिळविण्यासाठी किंवा सुख-सुविधा मिळवण्यासाठी किंवा यशस्वी लोकांची भाषणं ऐकून, सत्कार पाहून निवडू नये. आयुष्यभर चांगले जीवन जगण्यासाठी हा एकच पर्याय नसतो. स्पर्धा परीक्षेतून मिळणारी पदे कोणती आहेत, त्यांची जबाबदारी काय आहे तसेच त्या जबाबदा-या कर्तव्ये पार पाडण्यात आपण यशस्वी होऊ का व त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या सर्वांसाठी आपल्या मनाची पूर्ण तयारी आहे का याचा विचार करूनच या क्षेत्नात प्रवेश करावा. आजकाल खूप तरु ण-तरु णी पदवी घेऊनही मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा व्यवसाय सुरु करता येत नाही म्हणून या क्षेत्नाकडे वळताना दिसत आहेत.
या क्षेत्नात असणारी स्पर्धा व परीक्षेची अनियमितता (अलीकडील काळात परीक्षा काही प्रमाणात वेळेत होत आहेत, परंतु पदसंख्येचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे) पाहता मनाची पूर्ण तयारी करून आलेला विद्यार्थीच येथे यशस्वी होतो. या क्षेत्नात येणार्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की, आपण प्रशासनातील सर्वात वरच्या पातळीवर अधिकारी व्हावे परंतु प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होत नाहीत. सद्यस्थितीचा विचार करता सर्वप्रथम जे पद मिळेल ते घेऊन त्यानंतर पुढील पदासाठी अजून जोमाने तयारी करणेच योग्य आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
एका बाजूला मोठ्या पदावर निवड झालेल्यांच्या सुख-सुविधा, मान-सन्मान याचा विचार केला जातो परंतु त्याच वेळी ज्यांच्या पदरी अपयश पडले आहे त्यांची समाजात जी घुसमट होते त्याचा कोणी विचार करताना दिसत नाही. या क्षेत्नात जे यशस्वी होतात त्यांना त्यांच्या यशस्वी होण्याची कारणे सांगावी लागत नाहीत. परंतु जे अयशस्वी होतात त्यांची कारणे ते सांगू शकत नाहीत. समाज अयशस्वी लोकांची कोणतीही कारणे ऐकायला तयार नसतो. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या सर्वानी अपयश आले तर आपला पर्याय कोणता असावा याची तयारी करून ठेवावी. या क्षेत्नात यशस्वी होऊच असे ठरवून प्रत्येकजण इथे येत असतो, पण समजा नाहीच जमलं तर पुढे काय याचा विचारही मनाशी असलेला बरा!
या क्षेत्नात मला हेच पद हवे आहे आणी ते मिळेपर्यंत मी कोणतेही पद स्वीकारणार नाही असे करण्याऐवजी सर्वप्रथम कोणते पद मिळेल ते घेऊन आपले अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी तयारी करावी. यश मिळाले तर सर्व काही कल्पनेप्रमाणे होईलच परंतु अपयश आले तरी हाताशी पर्याय असेल. जगणं आपली परीक्षा पाहणार नाही.
(नगरपरिषद अभियंता, सांगोले नगरपरिषद, जि-सोलापूर)