मुरमाडी, किटाडी येथे ग्रामपंचायत पोटनिवडणूक
By Admin | Updated: December 18, 2015 01:02 IST2015-12-18T01:02:03+5:302015-12-18T01:02:03+5:30
तालुक्यातील मुरमाडी (सावरी) व किटाडी येथे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे मतदान दि. १९ डिसेंबरला होणार आहे.

मुरमाडी, किटाडी येथे ग्रामपंचायत पोटनिवडणूक
१९ डिसेंबरला मतदान : तीन जागांसाठी लढत
लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) व किटाडी येथे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे मतदान दि. १९ डिसेंबरला होणार आहे. मतमोजणी तहसील कार्यालयात दि. २१ डिसेंबरला पार पडणार आहे.
मुरमाडी (सावरी) येथे प्रभाग क्र. ३ साठी मतदान होणार आहे. इतर मागासवर्गीय महिलासाठी राखीव असलेल्या जागेवर माधवी जीवन बावनकुळे व प्रिया दिगांबर वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. किटाडी येथे प्रभाग १ करिता प्रिती मिलिंद गेडाम व विजय पंडीत बागडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्र. ३ मधून अशोक बालाजी चौधरी व धनंजय वामनराव घाटबांधे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत असून तिन्ही वॉर्डात दुहेरी लढत आहे.
तालुक्यातील केसलवाडा (पवार) व निमगाव येथे दोन प्रभागात अविरोध निवडणूक पार पडली. केसलवाडा (पवार) येथे श्रीराम चिंधू बोपचे व निमगाव येथे धनंजय वसंता कुबडे अविरोध निवडून आलेत. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, निर्णय अधिकारी मंडळ अधिकारी टी.आर. गिऱ्हेपुंजे, पुरामकर काम सांभाळत आहेत.
पिंपळगाव (सडक) पं.स. क्षेत्रातील पिंपळगाव धाबेटेकडी, रेंगेपार (कोहळी), खैरी, सामेवाडा, चिचटोला, सेलोटी या गावात मतदान होणार आहे. एकूण ८०१५ मतदार मतदान करणार आहेत. यात ३९५९ पुरुष व ४०२० महिलांचा समावेश आहे. पिंपळगाव (सडक) पं.स. चे सदस्यपद अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. पं.स. सदस्य मुन्ना नंदेश्वर यांचे निधन झाल्यामुळे पद रिक्त झाले होते. (तालुका प्रतिनिधी)