शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या माळपठारात पाणी पेटले

By admin | Updated: April 8, 2017 00:12 IST

पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या माळपठार भागात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे.

प्रादेशिक योजना कुचकामी : आठ दिवसातून एकदाच नळ, शेतशिवारातील विहिरींचा आधार पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या माळपठार भागात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे नळ आठ दिवसातून एकदाच येत असल्याने मुलांसह वृद्धांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शेतशिवारातील विहिरींवरून भर उन्हात बैलगाडी आणि डोक्याहून पाणी आणतानाचे चित्र दिसते. माळपठार भागात पाणीटंचाईमुळे अनेकांनी स्थलांतरण केले असून गावात पाहुणा आल्यास जेवणापेक्षा पाण्याचाच प्रश्न उभा असतो. पुसद : तालुक्यातील माळपठार भाग पाणीटंचाईसाठी कुप्रसिद्ध आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४० गाव माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. इसापूर धरणाच्या जवळा येथे जॉकवेलवरून पाणी घेतले जाते. फेट्रा येथे असलेल्या मुख्य टाकीतून पाणी ४० गावांमध्ये वितरीत केले जाते. परंतु विविध कारणांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत आहे. उन्हाळ्यात ही योजना कुचकामी ठरली आहे. आठ दिवसातून एकदा नळ येत असल्याने नागरिकांना शेतशिवारातील विहिरींवर जावे लागते. माळपठारातील बेलोरा, मारवाडी, रोहडा, वाडी, वागजाळी, म्हैसमाळ, पन्हाळा, मांजरजवळा, कुंभारी, हिवळणी, पिंपळगाव, आसोला यासह अनेक गावांत भर उन्हात पाणी भरतानाचे चित्र दिसत आहे. गावागावांत श्रीमंतमंडळी बैलगाडीवर ड्रम बांधून पाणी आणत आहे. रोजमजुरी करणाऱ्यांना डोक्यावर हांडे घेवून पाणी आणावे लागते. शालेय विद्यार्थी गणवेशातच पाणी आणतानाचे चित्र या भागात नवीन नाही. रात्रंदिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली तर ते वीजपुरवठ्याचे कारण करतात. सुरळीत वीज नसल्याने टाकी भरली जात नाही. त्यामुळे पुरेसे पाणी येत नसल्याचे सांगतात. मात्र, मुख्य कारण पाईप लाईनला लागलेली गळती आणि वसुली आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. एप्रिल महिन्यातच ही अवस्था, तर मे महिन्यात काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (कार्यालय चमू)