शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग भूसंपादनाचा मोबदला वितरित

By admin | Updated: April 7, 2017 02:21 IST

जिल्ह्याच्या विकासातील महत्वाकांक्षी वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी थेट जमिनीची खरेदी करण्याची मुभा शासनाने दिली.

सहा कोटींचे वाटप : कळंब तालुक्यातील ४८ शेतकऱ्यांना लाभ यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासातील महत्वाकांक्षी वर्धा- यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी थेट जमिनीची खरेदी करण्याची मुभा शासनाने दिली. आता या मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार गुरुवारी कळंब तालुक्यातील चापर्डा व घोटी या दोन गावांतील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या गावात जाऊन खरेदी-विक्री दराच्या चारपटीने जादा मोबदला वितरित करण्यात आला.या मार्गासाठी कळंब आणि यवतमाळ तालुक्यातील २९४ हेक्टर जमीन, तर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकूण एक हजार १४६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार ११ प्रकरणातील ४३ हेक्टर जमिनीचा पाच कोटी ४८ लाखांचा मोबदला जानेवारी २०१६ मध्ये देण्यात आला. त्यानंतर नवीन भूसंपादन कायदा लागू झाला. नवीन कायद्यानुसार जमीन संपादित करताना जनसुनावणी घेणे बंधनकारक होते. मात्र जिल्हा प्रशासन व भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांनी यातून सूट मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न केले. ही सूट मिळाल्यानंतर कलम ११ ची प्रक्रिया तीन वर्षात पूर्ण करण्याऐवजी दहा महिन्यातच पूर्ण करून अवार्ड घोषित करून शेतकऱ्यांना मोबदला वाटप केले जात आहे.कळंब तालुक्यातील घोटी येथील २२.०९ हेक्टर, तर चापर्डा येथील १४.५९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. त्यापोटी घोटी येथील ३१ शेतकऱ्यांना तीन कोटी ४० लाख ७६ हजार ७३५, तर चापर्डा येथील १७ शेतकऱ्यांना दोन कोटी ४८ लाख ९८ हजार १६५ रूपयांच्या मोबदल्याचे गुरूवारी गावात जाऊन वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, विशेष भूसंपादन अधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, कळंबचे तहसीलदार रणजित भोसले, चापर्डाच्या सरपंच सरला बंडाते यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते या मोबदला व जमीन संपादन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी परिसराच्या विकासासाठी रेल्वेचे फार मोठे योगदान असते, असे सांगितले. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असून व्यापारासोबतच शिक्षण व अन्य क्षेत्रातील विकासालाही हा मार्ग सिंहाचा वाटा उचलेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात यापूर्वीच रेल्वे मार्ग असता तर, शेतकऱ्यांवर यावर्षी कमी दरात तूर विकण्याची वेळ ओढवली नसती. किमान हजार ते पंधराशे रूपये त्यांना जादा मिळाले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मदतया मोबदल्यामुळे पुढील हंगामाकरिता शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध झाले. तसेच त्यांना दुसरीकडे मालमत्ता खरेदीसाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे. याशिवाय या प्रकरणातील संपूर्ण दस्तावेज अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. यात संयुक्त मोजणी अहवाल, मूल्यांकन, फळझाडे, वनझाडे, विहीर, अंतिम निवाडा आदी बाबी शेतकऱ्यांना आर्नलाईन उपलब्ध असणार आहे.