शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तूर विक्रीसाठी महिनाभराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:31 IST

ऑनलाईन लोकमतवणी : शासनाने शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेली तूर विकण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केल्याने शेतकरी आॅनलाईनमध्ये अडकला आहे, तर तूर विकण्यासाठी २० दिवस ते महिनाभराची प्रतीक्षा करावी लागत असल्याने तूर कोठे साठवून ठेवावी, असा प्रश्न अनेक शेतकºयांना पडला आहे.मागील वर्षीपासून शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन समाधानकारक होत आहे. मात्र तुरीला बाजारात भाव ...

ठळक मुद्देआॅनलाईनमध्ये अडकला शेतकरी : सीसीटीव्हीच्या निगराणीत मोजमाप

ऑनलाईन लोकमतवणी : शासनाने शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेली तूर विकण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केल्याने शेतकरी आॅनलाईनमध्ये अडकला आहे, तर तूर विकण्यासाठी २० दिवस ते महिनाभराची प्रतीक्षा करावी लागत असल्याने तूर कोठे साठवून ठेवावी, असा प्रश्न अनेक शेतकºयांना पडला आहे.मागील वर्षीपासून शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन समाधानकारक होत आहे. मात्र तुरीला बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांना अत्यल्प दरात तूर विकावी लागत होती. त्यामुळे शासनाने मागील वर्षीपासून नाफेडच्या सहकार्याने हमी दराने तूर खरेदी सुरू केली. तूर विक्रीसाठी एकाचवेळी शेतकºयांची गर्दी होऊन अनर्थ घडू नये, यासाठी शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करणे सक्तीचे केले. यावर्षी ५ फेब्रुवारीपासून आॅनलाईन नोंदणी व तूर खरेदीचा शुभारंभ झाला. येथील खरेदी विक्री संघामार्फत आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा तूर पिकाची नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स खरेदी विक्री संघाकडे द्यावी लागते. १३ मार्चपर्यंत १८७३ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. एका शेतकऱ्यांकडून एकरी चार क्विंटल या प्रमाणात व एक दिवशी कमाल २५ क्विंटल तूर खरेदी केली जाते. तुरीचा हमी भाव पाच हजार ४५० रूपये आहे. बाजारात यापेक्षा कमी भाव असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघाकडे गर्दी केली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ ५० शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाते. यासाठी बाजार समितीने तीन काटे सुरू केले आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या निगरानीत तूरीचे मोजमाप केले जाते. त्यानंतर शासन शेतकºयांच्या बँक खात्यात तुरीचा चुकारा जमा करते. नोंदणीचा वेग पाहता शेतकऱ्याला तूर विक्रीसाठी महिनाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे. १३ मार्चपर्यंत ३५८ शेतकऱ्यांकडून चार हजार ६५० क्विंटल तुरीची खरेदी नाफेडने केली.नाफेडच्या हरभरा खरेदीचा मुहूर्त कधी?शासनाने नाफेडमार्फत शेतकऱ्यांचा चनासुद्धा चार हजार ४०० रूपये या हमी भावात खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासाठीसुद्धा शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. आत्तापर्यंत २६६ चना उत्पादक शेतकऱ्यांनी चना विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र नाफेडने अजूनही चना खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे काही शेतकरी बाजारात व्यापाºयांना चना विकून आपली आर्थिक गरज भागवित आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.