शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’ची १६ कोटींची कर्ज वसुली वांद्यात

By admin | Updated: February 9, 2016 02:05 IST

पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचा पट्टा अवघ्या १९ व्या दिवशी पडल्याने या कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या १६ कोटींच्या कर्जाची वसुली वांद्यात सापडली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक : कर्ज मंजुरीसाठी बँक संचालकांना केले ‘खूश’, पुसदचाही दबावयवतमाळ : पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचा पट्टा अवघ्या १९ व्या दिवशी पडल्याने या कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या १६ कोटींच्या कर्जाची वसुली वांद्यात सापडली आहे. प्रकाश पाटील देवसरकर अध्यक्ष असलेला वसंत सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात सुमारे तीन महिने विलंबाने सुरू झाला. पर्यायाने कारखान्याच्या क्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांकडे आणि विशेषत: मराठवाड्याकडे गेला. १७ जानेवारी २०१६ रोजी वसंत कारखाना सुरू झाला आणि ५ फेब्रुवारीला बंद पडला. या १९ दिवसात केवळ १३ हजार ६०० टन उसाचे गाळप झाले. कारखान्याच्या गेल्या ४० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे कमी गाळप झाल्याचे सांगितले जाते. त्यातून दहा हजार पोते साखरेची निर्मिती झाली. या कारखान्याने कधी काळी साडेचार ते पाच लाख टन ऊस गाळपाचाही रेकॉर्ड नोंदविला आहे. यावर्षीसुद्धा सुमारे अडीच लाख टन ऊस गाळपाची अपेक्षा होती. मात्र राजकारणापायी संपूर्ण नियोजनच कोलमडले. केवळ १९ दिवस कारखाना चालल्याने कर्जाची वसुलीही होणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली.वसंत सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेने ५२ कोटी रुपये एकूण कर्ज दिले आहे. त्यातील काही कर्जाची वसुली झाली. त्यानंतर पुन्हा नुकतेच १६ कोटी रुपये कर्ज दिले. वास्तविक ठराव हा १३ कोटींचाच झाला होता. त्यानंतरही अतिरिक्त तीन कोेटींसह १६ कोटी रुपये कर्ज दिले गेले. वसंत कारखान्याला कर्ज देण्यास काही संचालकांचा विरोध होता. या कर्जासाठी संचालकांना ‘खूश’ केले गेल्याचे सांगितले जाते. शिवाय या कर्जाला कुणी विरोध करू नये म्हणून पुसदमधून खास प्रत्येक संचालकाशी संपर्कही केला गेला. मात्र काही संचालकांनी पुसदमधील हे ‘श्रेष्ठत्व’ नाकारून वसंतच्या कर्जाला आपला विरोध कायम ठेवला. या १६ कोटींच्या कर्जाची वसुली कशी करावी याचा पेच बँकेपुढे आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्यात असलेली ३३ हजार पोते साखरेचे तारण पुढे केले जात असले तरी प्रत्यक्षात कारखान्याच्या गोदामात २७ हजार पोतेच साखर असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे. विशेष असे कारखान्याकडील थकीत कर्जाची वसुली करताना पहिला दावा शासनाचा असतो. नंतर राज्य सहकारी बँक व त्यानंतर कुठे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कर्ज वसुलीसाठी नंबर लागतो. बँकेच्या आवाक्याबाहेरील कर्जाचे असे डझनावर नमुने उपलब्ध आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)