शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

विहिरींच्या पैशाच्या प्रतीक्षेत गेले दोन जीव

By admin | Updated: March 5, 2016 02:35 IST

शेती समृद्ध करण्यासाठी सिंचनाची सोय करण्याचा सल्ला प्रशासन देत असते. त्यासाठी धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला.

विधवा मातेचा टाहो : प्रशासनाच्या निगरगट्टतेने शेतकऱ्यांचा बळीयवतमाळ : शेती समृद्ध करण्यासाठी सिंचनाची सोय करण्याचा सल्ला प्रशासन देत असते. त्यासाठी धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला. पण या योजनेत आधी शेतकऱ्याला स्वत:च्या खर्चाने विहीर बांधवी लागते. मग प्रशासन पैसे देते. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी बांधल्या तरी शासकीय निधी त्यांच्या पदरात पडला नाही. दारव्हा तालुक्यातील हदगाव आणि घाटंजी तालुक्यातील पारव्याच्या शेतकऱ्यांनी तर निधीची वाट पाहात प्राण सोडले. आता त्यांच्या वृद्ध माताच जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसल्या आहेत. पण त्यांच्या उपोषणाची दखल घेण्याचीही सवड प्रशासनाला मिळालेली नाही.काही दिवसांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने सिंचन विहीर पूर्ण केल्यानंतरही मोबदला मिळाला नाही म्हणून बेमुदत उपोषण सुरू केले होते. जिल्हा प्रशासनाने यामध्ये तत्काळ लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. हे प्रकरण निकाली निघते ना निघते, तोच दारव्हा तालुक्यातील हादगावच्या सुमित्रा बबनराव गावंडे या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सुमित्राबार्इंचे पती १९ वर्षापूर्वी अपघातात गेले. तिच्या पती गेल्यानंतर दोन मुलांना लहानाचे मोठे सुमित्राबाईने केले. शासनाच्या योजनेतून विहीर मंजूर झाली. मुलाने कर्ज काढून विहीर बांधली. विहिरीसाठी १ लाख ९० हजार मंजूर झाले. मात्र १ लाख ३० हजार रूपयेच सुमित्राबाईला भेटले. उर्वरित ६० हजार रूपये भेटायचे आहे. यासाठी सुमित्राबाई आणि त्यांचा मुुलगा दीपक गावंडे यांनी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजविल्या. मात्र यानंतरही त्यांना उर्वरित पैसे भेटले नाही. विहीर पूर्ण झाल्याने कर्जदारांचा तगादा सुरूच झाला होता. शासनाचे पैसे नाही. वावरात पीक नाही, यामुळे दीपक संकटात सापडला. त्याचाच त्याने धस्का घेतला. त्यातच दीपकचा २२ आॅगस्ट २०१५ ला मृत्यू झाला. मात्र शासनाला जाग आली नाही. यामुळे न्यायाच्या लढाईसाठी सुुमित्राबाई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्याच बाजूला घाटंजी तालुक्यातील पारव्याच्या शशिकला तुुकाराम भवरे उपोषणाला बसल्या आहेत. त्यांची स्थितीही अशीच आहे. त्यांना पॅकेजमधून विहीर मंजूर झाली. ईश्वरचिठ्ठीने त्यांना विहीर मिळाली होती. २०१० मध्ये विहीर पूर्ण झाली. यासाठी शशिकलाबाईने कर्ज काढले होते. सहा वर्ष झाले पैसे मिळाले नाही. शासनदरबारी सारख्या येरझारा मारल्या, पण उपयोग झाला नाही. यामुळे शशिकलाबाईचा मुलगा त्रिभुवन भवरे याने आत्महत्या केली. पण अजूनही विहिरीचे पैसे भेटले नाही. यामुळे शशिकलाबाई उपोषणाला बसल्या आहेत. (शहर वार्ताहर)विहिरीचे मस्टर का निघत नाही ?जिल्ह्यातील १६ तालुक्यात सिंचन विहिरींचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या शेकडो येरझारा होत आहे. मात्र मस्टरच काढले जात नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. यानंतरही स्थानिक यंत्रणा हा विषय गांभीर्याने घेत नाही. आता तर बळीराजा चेतना अभियान सुरू आहे. यानंतरही शासनातील अधिकारी हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. बळीराजानेच फाडला अभियानाचा बुरखाज्या जिल्हा कचेरीच्या भिंतींवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी चित्रे रंगविण्यात आली, त्याच चित्रांपुढे आता निराश शेतकरी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे बळीराजा चेतना अभियानाच्या फलिताबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. धडक सिंचन विहिरीचा निधी शेतकऱ्यांना येरझारा मारल्यानंतरही मिळत नाही. चिरीमिरी न देणाऱ्यांचे बिल रोखले जाते. पंचायत विभागात गेल्यावर हा प्रकार दिसतो. अशाच प्रकरणात दोन मातांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे टाहो फोडला. भ्रष्ट यंत्रणेचा बुरखाच त्यांनी फाडला आहे.