शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सरळसेवेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:16 IST

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : दोन वर्षे संधी देऊनही अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर केले नसल्याने ‘एसटी’तील सरळसेवा भरतीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यवतमाळ विभागातील नऊ कर्मचारी या कारवाईच्या कक्षेत आहे. प्रसंगी त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई होऊ शकते. नियमाची पूर्तता करून घेण्यात घटक प्रमुखांचेही प्रयत्न झाले नसल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली ...

ठळक मुद्दे‘एसटी’चे नियम तोडले : अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स नाही

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : दोन वर्षे संधी देऊनही अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर केले नसल्याने ‘एसटी’तील सरळसेवा भरतीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यवतमाळ विभागातील नऊ कर्मचारी या कारवाईच्या कक्षेत आहे. प्रसंगी त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई होऊ शकते. नियमाची पूर्तता करून घेण्यात घटक प्रमुखांचेही प्रयत्न झाले नसल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे.सरळसेवा भरतीचे यवतमाळ विभागात १८ कर्मचारी आहेत. यातील काही आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक अधीक्षकांनी आपल्या सेवेची सात ते वर्षे होऊनही अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर केलेले नाही. विशेष म्हणजे पर्यवेक्षकीय पदावरील कर्मचारी याविषयी गंभीर नसल्याचा ठपका महामंडळाने वारंवार ठेवला आहे.सरळसेवा भरतीने सहायक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ कार्यदेशक, कनिष्ठ कार्यदेशक, प्रभारक, सहायक कार्यशाळा अधीक्षक या पदावर नियुक्ती दिली जाते. या कर्मचाºयांना रुजू होताच लर्निंग लायसन्स सादर करावे लागते. नियुक्ती दिल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स सादर करण्याची अट आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची जबाबदारी विभाग व घटक प्रमुखांवर सोपविण्यात आलेली आहे. तरीही कर्मचारी अटीची पूर्तता करीत नाही, तर घटक प्रमुखांकडून प्रयत्न होत नाही. लायसन्स मुदतीत सादर केली नसल्याची बाब पदाच्या अर्हतेचा भंग करणारी असल्याने कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. वार्षिक वेतनवाढ रोखणे आणि पुढे सेवा समाप्तीची कारवाई निश्चित करण्यात आली आहे. यवतमाळ विभागातील नऊ कर्मचाºयांनी लायसन्स सादर केलेले नाही. एसटी महामंडळाच्या राज्यातील इतर विभागातही अशा कर्मचाºयांची संख्या मोठी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर काय कारवाई होते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.चालकांवर अन्यायअपघातग्रस्त बसचा अहवाल सरळसेवा भरतीचे कर्मचारी अर्थात आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, अधीक्षक देतात. काही कर्मचाºयांजवळ अवजड वाहन चालविण्याचे लायसन्स नाही. अर्थातच त्यांनी अशा प्रकारचे वाहन हाताळले नाही. अपघात कसा झाला असेल, जबाबदार कोण याची माहिती अहवालात नोंदविली जाते. अनुभव नसलेले कर्मचारी अहवाल देतात. यामध्ये चालकांवर अन्याय होत असल्याची ओरड आहे.