शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

एसटी बस उलटून २१ जखमी

By admin | Updated: February 16, 2015 01:50 IST

तांत्रिक बिघाड होवून गिअर अडकल्याने भरधाव एसटी बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले.

यवतमाळ : तांत्रिक बिघाड होवून गिअर अडकल्याने भरधाव एसटी बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना यवतमाळ-आर्णी मार्गावरील अर्जुना घाटात रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. शशिकला लक्ष्मण गोल्हर, लक्ष्मण तानबा गोल्हर, जान्हवी जर्नादन गोल्हर, मंदा राजू गायधने, तुकाराम सोमला जाधव सर्व रा. लोणी, अंबादास नारायण पत्ते, गणेश किसन डवले, रमेश किसन डवले सर्व रा. पहापळ, वंदना गजानन खरतडे रा. आष्टी, लता अरूण तिडके, अश्विनी दीपक कौसटवार, मोहीत दीपक कौसटवार रा. मांग्लादेवी, माणिक शिवराम खद्रे, प्रमोद माणिक खद्रे रा. शिवणी, ज्योती प्रवीण शिंदे, रूद्रेश प्रवीण शिंदे, नजीमाबि शेख रहमान, रा.आर्णी, प्रभा माणिक बन्सोड रा. माहूर, रविता विजय जाधव, विजय मारोती जाधव रा. भंडारी आणि अशोक विठ्ठल मुनेश्वर रा. कृष्णापूर अशी जखमींची नावे आहेत. मोर्शी आगाराची बस (एमएच ४० - एन ८९६७) घेऊन चालक दिलीप विजयकर रविवारी सकाळी ११.३० वाजता मोर्शी-माहूर बस घेऊन निघाले. यवतमाळवरून आर्णीकडे जात असताना अर्जुना घाटाम गिअर अडकल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उतरून उलटली. त्यात २१ प्रवासी जखमी झाले. हा अपघात होताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. जखमींना चार रुग्णवाहिकांमधून येथील शासकीय रूग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर संतप्त प्रवाशांनी चालक दिलीप विजयकर यांना बेदम मारहाण केली. यात त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. (स्थानिक प्रतिनिधी)