शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

शिक्षकांअभावी खेळखंडोबा

By admin | Updated: January 4, 2015 23:22 IST

जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांच्या रिक्त जागांमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे़ दुसरीकडे अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा तिढा न्यायालयीन

अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा तिढा : रिक्त पदे भरण्यास परवानगीच नाहीवणी : जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांच्या रिक्त जागांमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे़ दुसरीकडे अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा तिढा न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने शिक्षण विभागही हतबल ठरला आहे़जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांची संच मान्यता यावर्षी नव्या शिक्षणाचा हक्क अध्यादेश २००९ व नव्या आकृतिबंधानुसार देण्यात आली़ या सन २०१३-१४ च्या संच मान्यतेनुसार काही शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले़ काही शाळांना शिक्षक व शिक्षकेतरांची पदे वाढूनही मिळाली़ रिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा प्रमुखांना दिल्या आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ सुरू झाली़अकोला जिल्ह्यातील ऊर्दू शाळेच्या एका अतिरिक्त शिक्षकाने आत्महत्या केली़ त्यानंतर शासनाने ऊर्दू शाळेच्या शिक्षक समायोजनास स्थगिती दिली़ याचाच परिणाम म्हणून मराठी माध्यमाच्या अतिरिक्त शिक्षकांचीही समायोजन प्रक्रिया तूर्तास थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे़ नव्या अध्यादेशामध्ये माध्यमिक शाळांमधील नाईक व प्रयोगशाळा परिचर ही पदे व्यपगत करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शाळांमधील नाईक व प्रयोगशाळा परिचर अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे वेतन शालार्थ प्रणालीत आॅनलाईन न काढता आॅफलाईन काढण्यात आले़ शिपाई व प्रयोगशाळा परिचरांना शिपाई पदावर पदावनत करण्याच्या सूचना देण्यात आल्या़ मात्र त्याच शाळेत लिपीक, प्रयोगशाळा सहायक ही पदे रिक्त असताना त्या पदावर पदोन्नती देण्यास नकार देण्यात आला़ वास्तविकत: वरिष्ठ लिपीक व प्रयोगशाळा सहायक ही पदे पदोन्नतीचीच पदे असतानाही पदोन्नती देण्यास परवानगी न मिळाल्याने नाईक व परिचरांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता़ त्यामुळे प्रयोगशाळा परिचरांनीसुध्दा न्यायालयाचे दार ठोठावले व पदावनतीवर स्थगनादेश मिळविला़ या सर्व घडामोडींमुळे अतिरिक्तच्या समायोजनाची प्रक्रिया रखडली आहे. मात्र यामुळे ज्या शाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ वेळापत्रक बनविताना शाळांना कसरत करावी लागत आहे़ विशिष्ट विषयांचे शिक्षक नसल्याने काही शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे़ मात्र शिक्षकांच्या रिक्त जागा भरायला परवानगी दिली जात नाही़ (स्थानिक प्रतिनिधी)