शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

हंगामापूर्वीच बाजारपेठ गडगडली

By admin | Updated: August 20, 2016 00:28 IST

केंद्र शासनाने महागाई नियंत्रित करण्यासाठी विदेशातून डाळींची आयात केली. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.

शेतमालाचे भाव निम्म्यावर : आयात डाळींचा परिणाम, अस्थिर दराने शेतकरी संभ्रमात यवतमाळ : केंद्र शासनाने महागाई नियंत्रित करण्यासाठी विदेशातून डाळींची आयात केली. याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. खरीप हंगाम संपण्यापूर्वीच बाजारात शेतमालाचे दर घसरले आहेत. हे दर निम्म्यापर्यंत खाली आल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. आताच दर घसरल्याने हंगामात दर मिळणार किंवा नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. डाळीचा तुटवडा दूर करण्यासाठी बाजारात ८ लाख मेट्रीक टन डाळाची आयात केली आहे. यामध्ये तूर, मूग, उडीद, चणा डाळीचा समावेश आहे. आयातीमुळे डाळीचे दर घसरले आहेत. याचाच परिणाम कडधान्यावर झाला आहे. साधारणत: जुलै-आॅगस्टमध्ये कडधान्याचे भाव वाढतात. हा अनुभव गृहीत धरून अनेक शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री केलीच नाही. परंतु, केंद्र शासनाने खरीप हंगामापूर्वीच डाळीची मोठ्या प्रमाणात आयात केली. यामुळे शेतमालाचे दर बाजारपेठेत निम्म्यावर आले आहे. यातून शेतकऱ्यांना जबर फटका सोसावा लागणार आहे. खरीप हंगाम संपण्यापूर्वी बाजारात शेतमालाचे दर निम्म्यावर आल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे. हंगामाला प्रारंभ होताच शेतमालाच्या दराची अवस्था काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. डाळ आयात झाल्याने खुल्या बाजारात डाळीचे दर पडले आहेत. याचा परिणाम तुरीच्या दरावर झाला आहे. पूर्वी १० हजार रूपये क्विंटल असलेली तूर आता ५ हजार ते ५ हजार ६०० रूपये क्विंटलच्या घरात आहे. या दरात ५० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. ९ हजार २०० रूपये क्विंटलच्या घरात असलेला चणा ४ हजार १०० ते सहा हजार ८०० रूपये क्विंटलच्या घरात आहे. यामध्ये निम्मी घसरण नोंदविण्यात आली आहे. चार हजार रूपये क्विंटलच्या घरात असलेले सोयाबीन ३२०० ते ३४५० रूपये क्विंटलच्या घरात आहेत. सात हजार रूपये क्विंटलचा मूग ४,७५० रूपये क्विंटलच्या घरात आहे. दर निम्म्यावर येण्याची पहिलीच वेळ कुठल्याही वस्तूचे दर किती वाढावे आणि किती घसरावे याचे ठोकताळे आहेत. मात्र शेतमालासाठी हे सर्व नियम मोडीत काढण्यात आले आहे. यामुळे शेतमालाचे दर घसरण्याची टक्केवारी एक-दोन नव्हेतर ५० टक्केच्या घरात आली आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत घसरणारे दर शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या स्थितीचा कुठलाही अभ्यास शासनाने केला नाही. यामुळे शेतमालाचे दर ५० टक्के खाली गेले आहे. ही कृषी धोरणातली पहिली दुर्दैवी घटना आहे.