शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

अपंगांच्या शाळा आता सीईओंच्या नियंत्रणात

By admin | Updated: September 27, 2015 01:58 IST

अपंग मुलांच्या शाळा शासनस्तरावर आजही दुर्लक्षित आहेत.

दर्जावर प्रश्नचिन्ह : लवकरच गठित होणार जिल्हास्तरीय समितीयवतमाळ : अपंग मुलांच्या शाळा शासनस्तरावर आजही दुर्लक्षित आहेत. मात्र, अनुदानापासून भौतिक सुविधांसारख्या सातत्याने भेडसावणाऱ्या अडचणी कुणाकडे मांडाव्या असा प्रश्न या शाळांपुढे आहे. या अडचणी सोडविण्यासाठी आता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक समिती बनविण्यात येणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात अपंगांच्या सुमारे ४० शाळा आहेत. त्यातील ३५ शाळा पूर्णपणे अनुदानित आहेत. तर काही शाळा विनाअनुदान तत्त्वावरही सुरू आहेत. अपंग मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणारी कर्मशाळाही वणीत सध्या सुरू आहे. परंतु, सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शाळांपेक्षा अपंगांच्या विशेष शाळांकडे पाहण्याचा समाजाचा आणि प्रशासनाचाही दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शासकीय निकषाप्रमाणे पुरेशा सोयी-सुविधा मिळतात किंवा नाही, याबाबत फारसी जागरूकता नाही. सध्या जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली या शाळांचा कारभार सुरू आहे. परंतु, बऱ्याच वेळा समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या स्तरावर अपंग शाळांच्या प्रश्नाची तड लागत नाही. महिनोन्महिने समस्या प्रलंबित राहतात. या समस्यांना आता तत्काळ तडीस नेता यावे म्हणून जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील. अपंगांसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील चार व्यक्तीही या समितीवर नेमल्या जाणार आहेत. तसेच प्रत्येक प्रवर्गातील अपंग विद्यार्थ्यांचे पालक, अपंग शाळांचे अध्यक्ष किंवा सचिव यांचाही समावेश राहणार आहे.सध्या जिल्ह्यात ४० शाळा असल्या तरी त्या प्राथमिकपर्यंतच आहेत. माध्यमिक शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यात केवळ दोनच शाळा आहेत. त्यातली एक घाटंजी तर दुसरी ढाणकीत आहे. त्यामुळे अनेक अपंग विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी नागपूर किंवा अमरावतीकडे धाव घ्यावी लागते. बहुतांश अपंग विद्यार्थ्यांचे पालक गरीब घटकातील आहेत. त्यांना हा खर्च पेलवत नाही. परिणामी, अनेकांना शिक्षण सोडून किरकोळ व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन उदरनिर्वाहाचा मार्ग धुंडाळावा लागतो. सर्वसामान्य शाळांमध्ये आता ई-लर्निंगचा प्रवाह सुरू झाला असला तरी, अपंगांच्या शाळांमध्ये अद्याप त्याचा मागमूसही नाही. वास्तविक पाहता अपंग विद्यार्थ्यांना शिकविताना ई-लर्निंगचा अधिक उपयोग होऊ शकतो, असा शिक्षकांचा विश्वास आहे. मुळात अपंग विद्यार्थ्यांना वयाच्या तिसऱ्याच वर्षी शाळेत दाखल करणे आवश्यक आहे. सहा-सात वर्षांचे वय झाल्यानंतर पाल्यास शाळेत दाखल केले जाते. पालकांमध्ये याविषयी जागृती आणण्याचे काम सर्वप्रथम नियंत्रण समितीला करावे लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)आम्ही नुकतीच सर्व शाळांची तपासणी करून त्यांचे ग्रेडेशन केले. तपासणीनंतर अपंगांच्या विशेष शाळांमध्ये सुधारणा होत आहे. ज्या शाळांची श्रेणी अद्याप वाढलेली नाही, त्यांची माहिती आयुक्तांना कळविली आहे. समितीद्वारे या शाळांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न होईल.- डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ.