शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

अध्यक्ष माघारल्या, शिक्षण सभापती टॉपवर

By admin | Updated: September 9, 2015 02:30 IST

आपल्या तालुक्याला सर्वाधिक डिजीटल स्कूल मिळाव्या यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे.

जिल्हा परिषद : डिजिटल स्कूलसाठी पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच यवतमाळ : आपल्या तालुक्याला सर्वाधिक डिजीटल स्कूल मिळाव्या यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यात सध्या तरी अध्यक्षांचा पुसद तालुका माघारल्याचे आणि शिक्षण सभापतींचा मारेगाव तालुका आघाडीवर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग डिजीटल स्कूल ही संकल्पना राबवित आहे. या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच तेथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहे. त्यासाठी काही प्रमाणात शासन निधी देत असले तरी बहुतांश शाळा या लोकसहभागातूनच डिजीटल व्हाव्या, असा शिक्षण विभागाचा सूर आहे. त्यासाठी त्या-त्या तालुक्यातील श्रीमंत व्यक्ती, दानदाते आणि सामाजिक तळमळ असलेल्या नागरिकांना शिक्षण विभागाकडून डिजीटल शाळांसाठी आर्थिक योगदानाचे आवाहन केले जात आहे. त्याला जिल्ह्यातील नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळतो आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदेत डिजीटल शाळा हा शब्द सर्वांच्याच कानावर पडतो आहे. मात्र कुणीच सुरुवातीला याकडे लक्ष दिले नाही. परंतु आता झोप उघडल्यागत जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी या डिजीटल शाळा व त्यासाठीचा निधी अधिकाधिक आपल्या तालुक्यात खेचून नेण्यासाठी प्रयत्नरत आहेत. पदाधिकारीच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्येही या शाळांसाठी चढाओढ लागली आहे. आतापर्यंत शिक्षण विभागाने ८० शाळांचे काम हाती घेतले आहे. आणखी ३० शाळांचा प्रस्ताव दाखल आहे. आगामी वर्षभरात जिल्ह्यातील सर्वच शाळा डिजीटल करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. सद्यस्थितीत डिजीटल शाळांबाबत शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांचा मारेगाव तालुका टॉपवर असल्याचे सांगितले जाते. त्या तुलनेत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांचा पुसद तालुका बराच माघारला आहे. तेथे आता कुठे शाळांच्या डिजीटलायझेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला तालुका टॉपवर रहावा, अन्य सभापतींच्या तुलनेत तो माघारला जाऊ नये यासाठी आता अध्यक्ष फुफाटे यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. त्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिक्षण विभागाकडून शब्द घेतला जात आहे. अधिकारी वर्गही ‘तुमचाच तालुका टॉपवर राहील’ याची हमी अध्यक्षांना देत असल्याचे सांगितले जाते. शिक्षण सभापतींच्या तालुक्यात प्रत्येक आठवड्यात कुठे तरी डिजीटल शाळांच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडतो आहे. अन्य सभापतींच्या मतदारसंघात मात्र हे सोहळे जणू दुर्मिळ झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र या सभापतींनी डिजीटल शाळा हा विषय गांभीर्याने घेतला आहे. सदस्यही आता आपल्या सर्कलमधील शाळा डिजीटल व्हाव्या यासाठी प्रयत्न करीत आहे. लोकसहभाग व दानदाते पाहून डिजीटल शाळांना टॅब मिळवून देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जात आहे. शाळांच्या कंपाऊंड, प्रसाधनगृह या सारख्या पायाभूत सुविधांसाठीसुद्धा गावकऱ्यांना लोकवर्गणी व लोकसहभागासाठी प्रोत्साहित केले जाते. त्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)