शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

जलसंधारणच नव्हेतर मनसंधारणही व्हावे

By admin | Updated: May 10, 2017 00:22 IST

पूर्वी पाण्याच्या कारणांवरून जातीभेद उफाळून यायचा. खालच्या जातीच्या लोकांना पाणीही दिले जात नव्हते.

जितेंद्र जोशी : कळंब तालुक्यातील पालोती, राजूर, शंकरपूरमध्ये मराठी सिनेअभिनेत्याचे श्रमदान गजानन अक्कलवार । लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : पूर्वी पाण्याच्या कारणांवरून जातीभेद उफाळून यायचा. खालच्या जातीच्या लोकांना पाणीही दिले जात नव्हते. दिलेच तर प्याला जमिनीवर ठेवला जायचा, ओंजळीतून पाणी पाजले जाई. पण आता पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्यासाठी गावांत एकोपा निर्माण झाला आहे. जातपात विसरून लोक एकत्र श्रमदान करीत आहे. यातून जलसंधारणाला निश्चितच गती मिळेल. पण जलसंधारणासोबतच मनसंधारण झाले, तर जलसंधारण अधिक गतीने होईल, अशी भावना प्रसिद्धी सिनेअभिनेते जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केली. पाणी फाऊंडेशनतर्फे तालुक्यात सुरू असलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेतील गावांमध्ये श्रमदान करण्यासाठी मंगळवारी जितेंद्र जोशी आले होते. त्यावेळी ‘लोकमत’कडे त्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. पाण्याचे महत्त्व तुम्ही कधी ओळखले या प्रश्नावर जितेंद्र जोशी म्हणाले, पाणी महत्त्वाचे आहे, हे माहीतच होते. पण आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनमध्ये मी जेव्हा प्रशिक्षण घेतले, तेव्हा पाण्याच्या समस्येचे भीषण स्वरूप माझ्या काळजाला भिडले. तेव्हापासूनच मी या जलसंधारणाच्या कामाशी जुळलो. पाण्यासाठी देशा-देशात युद्ध झाल्याचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. देशा-देशातील ही भांडणे आजही कायम आहेत. आता तर राज्या-राज्यात वाद आहे. कर्नाटक-तामीळनाडूतील भांडण सर्वांना माहीत आहे. एवढेच कशाला आपल्या महाराष्ट्रात तर लातूर आणि सांगली या जिल्ह्यात पाणी देण्या-घेण्यावरून मोठाच वाद झाला. पाणी टंचाईमुळे माणसा-माणसांतील अंतर वाढत आहे. ते कुठेतरी आपण कमी केलेच पाहिजे. पाणी बचत आणि जलसंधारण हाच त्यावरचा उपाय आहे, असे जितेंद्र जोशी म्हणाले. सेलिब्रिटी या कामात उतरल्याने लोकांना प्रेरणा मिळाली का असे विचारताच जोशी म्हणाले, आम्ही सेलिब्रिटी गावागावात जातो म्हणून लोक जमा होतात. पण हे आमचं यश नाही. लोकांचं आहे. सेलिब्रिटी निमित्तमात्र आहेत. लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात श्रमदान केले नसते तर आमचे काम झिरो होते. खुद्द मला ज्यांनी प्रेरणा दिली ते कोणी सेलिब्रिटी नव्हते. गाडगेबाबा, बाबा आमटे, प्रकाश आमटे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. अविनाश पोळ अशी मोबदल्याची अपेक्षा न ठेवता समाजासाठी झटणारी माणसे माझे खरे हिरो आहेत. जितेंद्र जोशी म्हणाले, येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण पाण्यासाठी झटले पाहिजे. मी स्वत: या कामासाठी एक पैसाही घेत नाही. प्रसिद्धी हादेखिल उद्देश नाही. केवळ लोकजागृती होणे महत्त्वाचे आहे. जबाबदारी, कर्तव्य समजून नैसर्गिक भावनेतून मी पाण्यासाठी काम करीत आहे. माणसाच्या जिवाचा भरवसा नाही. त्यामुळे आहो तोपर्यंत प्रत्येकाने इतरांना प्रोत्साहितच केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान मंगळवारी जितेंद्र जोशी यांनी कळंब तालुक्यातील पालोती, राजूर आणि शंकरपूर या गावांना भेटी देऊन श्रमदान केले. तसेच कळंब पंचायत समितीमध्ये तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांना मार्गदर्शनही केले. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, पंचायत समिती सदस्य स्वाती दरणे, गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, पाणी फाऊंडेशनचे तालुका संयोजक अशोक बागडे, अर्चना जवारे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले आदी उपस्थित होते. देवाशिवाय जगू, पाण्याशिवाय मरू पाण्याचे महत्त्व अधोरेखित करताना जितेंद्र जोशी म्हणाले, २० वर्षांपूर्वी कुणी म्हटले असते की, एक लिटर पाणी २० रूपयात मिळेल, तर आपण त्याला मुर्खात काढले असते. पण आज तीच परिस्थिती खरी आहे. कुणी सांगावे, उद्या एक लिटर पाण्याची बाटली दोन हजार रुपयांना घ्यावी लागेल. असे होऊ द्यायचे नसेल तर आपल्याला आजच मेहनत घ्यावी लागेल. मी ईश्वर मानत नाही, पण निसर्ग मानतो. आपला राजकीय पक्ष, आपला अहंकार, जात एवढेच काय देवाशिवायही आपण जगू शकतो. पण पाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून पाणी वाचवा, तुम्हीही वाचाल!