शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

२० लाखांच्या वृक्षतोडीत केवळ वनरक्षक निलंबित

By admin | Updated: September 13, 2015 02:15 IST

कृष्णापूर वनवर्तुळातील सुमारे २० लाख रुपयांच्या सागवान तोडीत केवळ एका वनरक्षकाला निलंबित करण्यात आले असून ...

तीव्रता दडपली : आरएफओ-एसीएफच्या बचावासाठी धडपड उमरखेड : कृष्णापूर वनवर्तुळातील सुमारे २० लाख रुपयांच्या सागवान तोडीत केवळ एका वनरक्षकाला निलंबित करण्यात आले असून उमरखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोदाजी चव्हाण आणि सहायक वनसंरक्षकांना वाचविण्यासाठी पुसद डीएफओ कार्यालयातून धडपड सुरू असल्याची माहिती आहे. उमरखेड वनपरिक्षेत्रांतर्गत कृष्णापूर वनवर्तूळातील पिरंजी बीटमध्ये चार दिवसांपूर्वी सुमारे २० लाखांच्या सागवानाची तोड उघडकीस आली. वनअधिकारी व तस्करांच्या संगनमताने ही तोड झाल्याचा अंदाज आहे. ५०० पेक्षा अधिक परिपक्व झाडांची कत्तल केली गेली. शुक्रवारी पुसदचे उपवनसंरक्षक कमलाकर धामगे यांनी वृक्षतोड झालेल्या ठिकाणी भेट दिली. प्राथमिक चौकशीअंती पिरंजीचे वनरक्षक व्ही.सी. जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. या वृक्षतोडीला एसीएफ, आरएफओ, वनपाल ही प्रमुख मंडळी जबाबदार असताना केवळ वनरक्षकाचा बळी देऊन या अधिकाऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. निलंबित वनरक्षकाला नुकतीच वनपाल पदावर बढती देण्यात आली होती. बढतीवर त्यांची वन्यजीव विभागाच्या बिटरगाव वनवर्तूळात (पांढरकवडा वन्यजीव विभाग) नेमणूक देण्यात आली. मात्र ते कार्यमुक्त झाले नाही. २० लाखांच्या या अवैध वृक्षतोडीची तीव्रता दडपण्याचा प्रयत्न कारवाईच्या भीतीने केला जात आहे. कक्ष क्र.४६३ मध्ये केवळ तीन लाखांची तोड दाखविण्याची व्यूहरचना केली जात आहे. आजूबाजूच्या जंगलातून लाकूड जमा करून ५० हजारांचे लाकूड वाचविल्याचाही देखावा निर्माण केला जाणार आहे. मूळ वृक्षतोड झालेल्या कक्ष क्र.४६२ व ४६४ ची अद्याप चौकशी व निरीक्षण नोंदविले गेले नाही. वृक्षतोडीची व्याप्ती दिसू नये म्हणून चक्क बुंदे गायब करण्याचा प्रयत्नही केले जात आहे. विशेष असे, उमरखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी बदलीसाठी पात्र असताना त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली गेल्याचे सांगितले. यावरून उमरखेड वनपरिक्षेत्रातील आरएफओ गोदाजी चव्हाण यांचा ‘इंटरेस्ट’ दिसून येतो. वनअधिकाऱ्यांच्या संगनमतानेच २५० पेक्षा अधिक परिपक्व झाडांची तोड करून हे सागवान तेलंगाणा व मराठवाड्यात तस्करांनी नेल्याचा संशय आहे. वानेरमाळ येथेही वृक्षतोड आढळून आली. लगतच्या निंगनूर जंगलातही ही तोड झाली आहे. काही दिवसांपूर्वी बैलगाडी पकडून त्यातही ‘सेटींग’ केली गेली होती. कृष्णापूर जंगलात खास गणेश व लेल्या नामक मिस्त्रीची नियुक्ती करून कधी आरीने तर कधी हाताने सागवान तोड करण्यात आली. त्यात तेथील वनरक्षक अरविंद राठोड यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगण्यात येते. २० लाखांच्या वृक्षतोडीसाठी तस्करांनी खास मजूर लावले होते. या तस्करीने वनखात्याच्या तपासणी नाक्यांची उपयोगिता शून्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दरम्यान, वनरक्षक जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. अद्याप चौकशी सुरू आहे. दोन दिवसात सर्व काही निष्पन्न होईल. त्यात दोषी आढळलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाणार असल्याचे पुसदचे डीएफओ कमलाकर धामगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (शहर प्रतिनिधी)सीसीएफ गुरमेंनी बाहेरील अधिकारी नेमावेतउमरखेड वनपरिक्षेत्रातील २० लाखांची तोड रेकॉर्डवर आल्यास वनरक्षकापासून डीएफओपर्यंत सर्वांवरच निष्क्रियतेचा ठपका ठेऊन कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून या वृक्षतोडीची तीव्रता दडपण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. या वृक्षतोडीचे वास्तव रेकॉर्डवर यावे यासाठी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी पांढरकवडा किंवा अन्य विभागातील चांगल्या प्रतिमेच्या अधिकाऱ्याची या वृक्षतोडीच्या चौकशीसाठी नेमणूक करावी, असा वन्यप्रेमी व कृष्णापूर परिसरातील गावकऱ्यांचा सूर आहे. साधा वनरक्षक एवढ्या मोठ्या वृक्षतोडीला एनओसी देऊ शकत नाही. त्यात एसीएफ, आरएफओ, वनपाल हे सर्वच थेट सहभागी असावे. डीएफओंची निष्क्रियता त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. म्हणूनच अन्य डीएफओंकडून गुरमेंनी चौकशी करावी, असा जोरदार सूर आहे. विशेष असे, स्वत: गुरमे ५ फेब्रुवारी २००६ ते १५ जुलै २००९ या काळात पुसदचे डीएफओ राहिले आहेत. त्यामुळे त्यांना पुसद विभागातील सागवान वृक्षांची उपयोगिता किती याची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच त्यांच्याकडून वास्तव चौकशीची अपेक्षा केली जात आहे. या वृक्षतोडीवर आताच नियंत्रण न आल्यास भविष्यात पुसद विभागातील जंगलाचा वाळवंट झाल्याचे पाहण्याची वेळ येऊ शकते. पुसद विभागात अप्प्या हा सागवान तस्कर सर्वपरिचित आहे. खंडाळा व परिसरात तो सागवान तोड करतो. मात्र अद्यापही त्याला अटक झाली नाही. वनअधिकारी त्याच्या वाटेला जाण्यास घाबरत असल्याचेही सांगितले जाते.