शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

आता डोंगर पोखरणारे जिल्हाधिकाऱ्यांचे टार्गेट

By admin | Updated: June 13, 2015 02:28 IST

रेती माफियांपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी आता यवतमाळ शहरासह जिल्हाभरातील गिट्टी खदान व क्रशर व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

गिट्टी खदान-क्रशर : लांबी-रुंदी-उंची मोजण्याचे आदेश यवतमाळ : रेती माफियांपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी आता यवतमाळ शहरासह जिल्हाभरातील गिट्टी खदान व क्रशर व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. डोंगर पोखरणाऱ्यांना आता धडा शिकविला जाणार आहे. नदी-नाले, डोंगर-दऱ्या, वृक्ष ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मात्र या साधन संपत्तीचीही रॉयल्टीच्या नावाखाली लूटपाट सुरू आहे. रेती माफियांविरुद्ध धडक मोहीम उघडणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मुरुम, मोठे दगड काढणाऱ्या गौण खनिज कंत्राटदारांविरुद्धही मोर्चेबांधणी चालविली आहे. यवतमाळ शहरात चहूबाजूने डोंगर पोखरले गेले आहे. त्यातून मोठमोठ्ठे दगड काढून क्रशरद्वारे त्याची गिट्टी बनविले जाते. ही गिट्टी अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांना विकली जाते. गौण खनिज कंत्राटदारांनी मोठमोठ्ठे डोंगर अक्षरश: पोखरले आहे. दारव्हा रोड, गोदनी रोड या भागात त्याचे सबळ पुरावे उपलब्ध आहे. आतापर्यंत गावातील पुढारी व लोकल प्रशासनाला हाताशी धरुन हा कारभार सुरू होता. मात्र आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यात लक्ष घातल्याने या लोकल प्रशासनाची कोंडी झाली आहे. डोंगर फोडून मोठ्ठाले दगड काढणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी होणार आहे. त्यांनी कोणकोणत्या खदानी घेतल्या, त्यातून किती दगड काढला, त्यापोटी किती रॉयल्टी भरली, त्यांच्यामार्फत विक्री होणाऱ्या गिट्टी-बोल्डरचा दर काय या सर्व बाबींची चौकशी होणार आहे. खदानींची लांबी-रुंदी-उंची मोजली जाणार आहे. त्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारासह या खदानींवर देखरेख ठेवणाऱ्या लोकल शासकीय कर्मचाऱ्यांवर फौजदारी केली जाणार आहे. त्यामुळे गिट्टी खदान-क्रशर मालकांचे धाबे दणाणले आहे. रेती माफियांवर दहा दिवसात शंभरावर गुन्हे नोंदविले गेले. अगदी तशाच पद्धतीने आता गिट्टी खदान-क्रशर मालकांवर गुन्हे नोंदविले जाण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)