शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

इंग्रजी शाळेच्या मुलांची मराठी मोडकी-तोडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:49 IST

फाडफाड इंग्रजी बोलू शकणारा मुलगा मायबापाच्या कौतुकाचा विषय ठरतोय. पण तोच मुलगा थैली घेऊन बाजारात गेला की, चक्रावून जातो. काय घ्यावे अन् किती रुपयांचे घ्यावे, हे त्याला कळेनासे होते. शेवटी घरी बाबाला विचारतो एक पाव म्हणजे किती? दहा म्हणजे टेनच ना? इंग्रजी शाळांमध्ये मराठीवर होणाऱ्या दुर्लक्षाचे हे परिणाम आहेत. भावी पिढीची भाषाविषयक जाणीव बिघडविणारे हे दुर्लक्ष दूरगामी नुकसान करणारे ठरत आहेत.

ठळक मुद्देशाळेतले जिनियस, व्यवहारात चक्रावले : शाळांच्या दुर्लक्षाने बिघडतेय मुलांची भाषाविषयक जाणीव

अविनाश साबापुरे/रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फाडफाड इंग्रजी बोलू शकणारा मुलगा मायबापाच्या कौतुकाचा विषय ठरतोय. पण तोच मुलगा थैली घेऊन बाजारात गेला की, चक्रावून जातो. काय घ्यावे अन् किती रुपयांचे घ्यावे, हे त्याला कळेनासे होते. शेवटी घरी बाबाला विचारतो एक पाव म्हणजे किती? दहा म्हणजे टेनच ना? इंग्रजी शाळांमध्ये मराठीवर होणाऱ्या दुर्लक्षाचे हे परिणाम आहेत. भावी पिढीची भाषाविषयक जाणीव बिघडविणारे हे दुर्लक्ष दूरगामी नुकसान करणारे ठरत आहेत.यवतमाळातील बच्चे कंपनी, त्यांचे पालक, शिक्षक आदींच्या प्रतिक्रिया ‘लोकमत’ने जाणून घेतल्या, तेव्हा अत्यंत खेदजनक बाबी पुढे आल्या. प्रतिक्रिया देताना प्रत्येक जण म्हणाला, स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे. पण घरात जेव्हा मुलाला मराठी बोलताना अडखळताना बघतो, तेव्हा वाईट वाटते. शाळेत हुशार असलेला मुलगा घरी घड्याळात किती वाजले हे सांगू शकत नाही. बारा वाजले असे त्याला सांगितले, तर तो विचारतो बारा म्हणजे किती? बाजारात त्याला घेऊन जावे आणि एक पाव भाजी घ्यावी, तर तो विचारतो एक पाव म्हणजे किती किलो? इंग्रजी शाळांमध्ये कौतुकाने मुलांना पाठविणारे पालक पोरांच्या मराठी भाषेविषयी सांगताना दु:खी झाले होते.त्याचवेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया जाणून घेताना आणखीच गंभीर बाबी पुढे आल्या. इंग्रजी शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना मराठीतून प्रतिक्रिया देताना शब्द सापडत नव्हते. नेमक्यावेळी कोणता शब्द बोलावा, हे सूचत नव्हते. मनातली भावना व्यक्त करताना अडचणी येत होत्या. शेवटी, ‘आम्हाला शाळेत जे सांगतात, तेच आम्ही करतो’ एवढे बोलून अनेक मुलांनी स्वत:ची सुटका करून घेतली.इंग्रजी शाळांचे प्राचार्य मात्र ठामपणे म्हणाले, आमच्या शाळेत आम्ही मराठी शिकवतोच. आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. शाळेत नियमित मराठीच्या तासिका घेतल्या जातात, असे बहुतांश प्राचार्यांनी सांगितले. मात्र असे असतानाही मुलांना मराठी निट का बोलता येत नाही, या प्रश्नावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते.लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार यांनी गेल्या दीड वर्षापासून राज्य सरकारकडे मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. प्रत्येक शाळेत मराठी शिकविलीच पाहिजे, असा आग्रह त्यांनी सरकारकडे धरला आहे. त्याचे आता सकारात्मक परिणाम दिसत असून मुख्यमंत्र्यांनीही नुकतीच याबाबतीत घोषणा केली. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक असून कोणत्याही शाळेने त्यात पळवाट शोधू नये, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने यवतमाळातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आढावा घेतला. त्यात अनेक शाळांत मराठी शिकविली जात असल्याचा दावा प्राचार्यांनी केला. मात्र प्रत्यक्ष मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, मुलांची मराठी मोडकी-तोडकी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रत्येक शाळेत मराठीचे अध्यापन अधिक प्रभावी आणि सक्तीचे करणे आवश्यक झाले आहे.मराठी बोलाल, तर इंग्रजी कशी शिकाल?इंग्रजी माध्यमाच्या प्रत्येक शाळेने ‘लोकमत’शी बोलताना आम्ही मराठी शिकवतोच असा दावा केला. प्रत्यक्षात मात्र शाळेत मराठी बोलू नये, अशी सक्ती केली जात असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळेत एकतर इंग्रजी किंवा हिंदीतच बोलण्यास सांगितले जाते. मराठीतून संवाद साधत राहिल्यास इंग्रजी संभाषण कौशल्य अवगत करण्यास वेळ लागेल, असा काही शाळांचा गैरसमज असल्याची गंभीर बाब यानिमित्ताने पुढे आली. शाळेत अधिकाधिक संवाद इंग्रजी किंवा हिंदीतच व्हावा, असा आग्रह धरणाऱ्या शाळा पालकांनाही घरी मुलांशी याच भाषांतून बोलण्याची सूचना देत असतात. असे केल्यासच तो इंग्रजी चांगला बोलू शकेल, त्याला सीबीएसईचा अभ्यासक्रम झेपेल, असा गैरसमज पालकांच्याही मनात पेरला जात आहे.