शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

वणीत वीज ग्राहकांची लूट

By admin | Updated: January 15, 2017 01:06 IST

वीज वितरण कंपनीच्या वीज देयक आकारणीचे ताळतत्र बिघडले असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रिडींग न घेता अवाढव्य देयके : एजन्सीवरील नियंत्रण सुटले वणी : वीज वितरण कंपनीच्या वीज देयक आकारणीचे ताळतत्र बिघडले असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एजन्सीचे कर्मचारी मिटर रिडींग न घेता ग्राहकांची लुबाडणूक करण्यासाठी वीज वितरण कंपनीला सहकार्य करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांकडे कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत आहे. बाहेरील पथकाने शहरात येऊन वीज चोरी उघडकीस आणून लाखो रूपयाचा दंड वसुल करून स्थानिक अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब केले आहे. वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या मिटरचे दरमहा फोटो रिडींग व देयके वितरणासाठी एका एजन्सीची नियुक्ती केली. मात्र ही एजन्सी ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत दरमहा पोहचत नाही. स्वत:च्याच मर्जीने ब्लॅक, रिडींग घेणे अवघड अशी कारणे दाखवून सरासरी युनिटचे देयक तयार केले जाते. मात्र सरासरीचे देयक तयार करताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे डोके ठिकाणावर नसते. त्यामुळे मीटरमध्ये दाखवीत असलेल्या आकड्यापेक्षाही अधिक युनिटचे बिल ग्राहकांना पाठविले जाते. एखाद्या महिन्यात ग्राहक सदर देयकाची रक्कम मुकाट्याने भरून टाकतो. मात्र एजन्सीचे एवढ्यावर भागत नाही. त्यापुढील महिन्यातही पुन्हा सरासरीचे बिल दिल्या जाते. दोन-तीन महिन्यानंतर रिडींग घेतल्यानंतर त्याला विजेचा दर टप्यानुसार अधिक लावण्यात येतो. त्यामुळे ग्राहकांना अकारण भुर्दंड सहन करावा लागतो किंवा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारून देयक दुरूस्त करून द्यावे लागते. एजन्सीच्या या कामचुकार पणामुळे कार्यालयात देयक दुरूस्तीसाठी ग्राहकांची गर्दी होते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यावरही कामाचा ताण वाढतो. परिणामी काही ग्राहकांना कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक न मिळाल्याने कर्मचारी व ग्राहक यांच्यात खटके उघडण्याच्या घटना घडत असतात. शहरात मोठ्या प्रमाणात विज चोरी होत आहे. बाहेरील पथकाने नुकतीच शहरातील काही ग्राहकांची वीज चोरी उघडकीस आणून लाखो रूपये दंड वसुल केला. मग येथील अधिकाऱ्यांच्या वीज चोरी कशी लक्षात येत नाही, असा प्रश्न ग्राहक विचारीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)