शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

नजर पैसेवारीबाबत शेतकरीच आहेत अनभिज्ञ

By admin | Updated: October 28, 2015 02:44 IST

वणी तालुक्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना केवळ साखरा (को.) व जुगाद या दोनच गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी कशी आली,...

वणी : वणी तालुक्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना केवळ साखरा (को.) व जुगाद या दोनच गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी कशी आली, हे कोडेच जनतेपुढे होते. मात्र यवतमाळ येथील लोकजागृती मंच या सामाजिक संस्थेने या कोड्याची उकल केल्याने सर्वांनाच धक्का बसला. या संस्थेने या दोन गावातील समितीच्या चौकस कामगिरीबद्दल समिती सदस्यांचा सत्कार केला. या उकलीमुळे प्रशासन मात्र चांगलेच तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे.महसूल प्रशासनाने नुकतीच जिल्ह्यातील १४ हजार ७०८ गावांची पैसेवारी काढली. संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत असताना केवळ दोनच गावे ५० पैशाच्या आत आली. जिल्ह्यात नऊ लाख ९६ हजार ५५० हेक्टर शेतजमीन पेरणीयोग्य आहे. परंतु विविध कारणामुळे २३ हजार १०८ हेक्टर जमिन पडीत राहिली. कापूस पीक चार लाख ७७ हजार ९१० हेक्टर क्षेत्रात पेरले गेले. दोन लाख ४८ हजार ५४९ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. मात्र अपुरा पाऊस व वातावरणातील विचित्र बदलाने दोन्ही पिके संकटात सापडली. सोयाबीन एकरी एक ते दोन क्विंटल पिकले. कापसाची झाडे वाळायला लागली. दिवाळीनंतर शेतकऱ्यांना कापूस वेचायला शिल्लक राहणार नाही, अशी स्थिती आहे. तरीही जिल्हा दुष्काळग्रस्त ठरला नाही. त्यामुळे वास्तव जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या अध्यक्षतेखालील लोकजागृती मंच या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेमध्ये शैलेश इंगोले, शालिक चवरडोल, सय्यद रफिक, गजानन पाचोडे, संजय निकडे, वामन राठोड, वसंता पवार, संजय डंभारे, सय्यद शब्बू, जयवंता आडे, तुळशिराम आडे, रणजित जाधव, मिलींद चव्हाण, वासुदेव राठोड, सुभाष राठोड, हरिदास राठोड, सुहास काळे, लालसिंग अजमेरकर यांचा समावेश आहे. या चमूने रविवारी साखरा (को.) व जुगाद या गावांना भेट देऊन तेथील पीक परिस्थितीची पाहणी केली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी असे आढळून आले, की या दोन गावांसारखी पीक परिस्थिती जिल्ह्यातील अनेक गावांची आहे. मग इतर गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त कशी आली?, यावर समितीने चिंतन केले. त्यावेळी खरे वास्तव समोर आले. साखरा व जुगाद या दोन गावातील समितीने वास्तविक परिस्थिती मांडली. इतर गावात अशा समितीने गठणच करण्यात आले नाही. केवळ मंडळ अधिकारी व तलाठ्यांनीच पैसेवारी काढून शासनाच्या दबावाखाली त्यांनी पैसेवारी फुगवून दाखविली. त्यामुळे पीक पडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत असतानाही गावाची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आली. परिणामी शेतकरी दुष्काळापासून दुरावला गेला. देवानंद पवार यांनी शासनाच्या शेतकरी भूमिकेवरही सडकून टिका केली. शासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. शासनाचे बळीराजा चेतना अभियान म्हणजे ‘जखम मांडीला व मलम शेंडीला’ असा प्रयोग असल्याा आरोप त्यांनी केला. शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर राहून उपयोग नाही, तर गंभीर होणे गरजेचे असे त्यांनी स्पष्ट केले. या समितीने पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्यात देवानंद पवार यांनी पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित करून जिल्हाधिकारीही शेतकऱ्यांवर बेगडी प्रेम करीत असल्याचा आरोप केला. शेतकरी तक्रार घेऊन भेटीसाठी गेला असता, त्याला धुडकावून लावले जाते. शासनाने जिल्ह्यातील पीक उत्पादनाचा वास्तविक आढावा घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)