शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Lok Sabha Election 2019; ईव्हीएमची संगणकाद्वारे सरमिसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:17 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात संगणकीय प्रणालीद्वारेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यांची सरमिसळ केली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : २४ उमेदवार असल्याने पाच हजार ४८० बॅलेट युनीट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात संगणकीय प्रणालीद्वारेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यांची सरमिसळ केली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी पत्रपरिषदेत दिली.नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. आता निवडणूक रिंगणात २४ उमेदवार कायम आहेत. यामध्ये राष्ट्रीय पक्षाचे तीन उमेदवार आहेत. जाहीर प्रचाराला सुरुवात झाली असून हा प्रचार ९ मार्चच्या सायंकाळी ६ वाजता बंद होणार आहे. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व विधानसभा क्षेत्रस्तरावर ईव्हीएम सरमिसळ करून पाठविण्यात आले आहेत. पुन्हा एकदा २९ मार्च रोजी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे द्वितीय सरमिसळ संगणकीय प्रणालीद्वारे केले जाणार आहे.आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठकही झाली आहे. निवडणूक प्रक्रियेत असलेले कर्मचारी व सैनिकांसाठी पोस्टल बॅलेटची प्रक्रिया यावेळेस आॅनलाईनद्वारे केली जाणार आहे. इटीपीबीएस प्रणाली तयार केली असून या सॉफ्टवेअरमधून डाऊनलोड केलेल्या पोस्टल बॅलेटवरच कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. या बॅलेट आॅनलाईन जात असल्या तरी त्या पोस्टाद्वारेच स्वीकारण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेच्या दिवशी सकाळी ८ पर्यंत या पोस्टल बॅलेट प्राप्त होतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आचारसंहितेच्या अनुषंगाने पोस्टर बॅनर्स काढण्यात आले आहे. भिंतीवर केलेले २५० पेंटींग मिटविले आहे. तीन हजार ८१६ पोस्टर काढले, एक हजार ७४८ बॅनर काढण्यात आल्याची माहिती दिली. प्रत्येक उपविभागीय अधिकारी स्तरावर इव्हीएम ठेवण्यासाठी तात्पुरते स्ट्राँग रूम तयार केले आहे. त्यानंतर हे सर्व ईव्हीएम दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामात ठेवण्यात येणार आहे. तेथेच मतमोजणीची प्रक्रिया होईल, असेही सांगितले. माध्यम समितीच्या शिफारशीवरून पेड न्यूज संदर्भात काँग्रेसच्या उमेदवाराला नोटीस बजाविल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.३५० रुपये कापण्याची केवळ अफवासोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून मतदान न केल्यास बँक खात्यातील ३५० रुपये कापले जाईल, असा मॅसेज फिरत आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांना विचारणा केली असता, ती एक अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक