डॉक्टरांची सतर्कता : किडणीसह पानथरीचे झाले तुकडे, आतडे फ ाटले, पोटात साचले तीन लिटर रक्तसुरेंद्र राऊत यवतमाळशाळेत जाताना झालेल्या आॅटोरिक्षा अपघातात उजवी किडणी, पानथरीचे (स्पीनींग) पुर्णत: तुकडे तुकडे झालेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याला येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या तत्परतेने जीवनदान मिळाले आहे. अपघातात खुशालची झाले होते. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अवघ्या दोन तासात पूर्ण करण्यात आली. खुशाल देविदास राठोड (११) रा. माहळुंगी ता.आर्णी असे अपघातग्रस्त विद्यार्थ्याचे नाव आहे. आॅटोरिक्षने आर्णी येथील शाळेत जाताना झालेल्या अपघातात खुशाल आॅटोरिक्षाखाली दबला होता. त्यात त्याच्या पोटात व छातीत अंतर्गत मोठ्या जखमा झाल्या. गंभीर अवस्थेत शासकीय वैद्यकीय महविद्यालयात त्याला दाखल केले. येथे तातडीने तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी त्याच्या छातीत रक्त जमा झाल्याचे आढळून आले. त्यानंतर सिटिस्कॅनमध्ये पोटतही दोन लिटर रक्त जमा झाल्याचे दिसून आले. शिवाय आतडे ठिकठिकाणी फाटले, उजवी किडणी व पानथरीचे पूर्णत: तुकडे तुकडे झाले होते. अशाही स्थितीत शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. अमोल देशपांडे यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. याबाबत अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड आणि सर्जरी विभाग प्रमुख डॉ. गिरीश जतकर यांच्याकडे मार्गदर्शन मागण्यात आले. खुशाल वाचण्याची शक्यात केवळ ५ टक्केच असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतरही शर्थीचे प्रयत्न करून शरिरात जमा झालेले रक्त, किडणी व पानथरीचे तुकडे पोटातून काढण्यात आले. ही शस्त्रक्रिया १७ जानेवारी २०१७ ला दुपारी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. अद्ययावत उपचार पध्दतीने आता खुशाल ठणठणीत झाला. खुशालचा एकप्रकारे पुनर्जन्मच झाला. या शस्त्रक्रियेत डॉ. स्वप्निल मदनकर, डॉ. जयदीप जाधव, डॉ. अविनाश चंद्रा, डॉ. विशाल, बधिरीकरण विभाग प्रमुख डॉ. पटवर्धन, डॉ. शेंडे, डॉ. भूषण अंभोरे, परिचारिका स्वाती रोडगे यांनी सहकार्य केले.
गंभीर जखमी खुशालला ‘मेडिकल‘मध्ये जीवनदान
By admin | Updated: February 17, 2017 02:29 IST