शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

‘जोश-२०१६’ : पहिल्या दिवशी विविध स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: January 9, 2016 02:51 IST

लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश-२०१६’ अंतर्गत पहिल्या दिवशी विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

सखी मंच : ‘जरा नच के दिखा’ कार्यक्रमाने धमालयवतमाळ : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंचच्यावतीने आयोजित ‘जोश-२०१६’ अंतर्गत पहिल्या दिवशी विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सखींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फुर्तपणे भाग घेतला. पहिल्या दिवशीचे आकर्षण ठरले ते ‘जरा नच के दिखा’ हा कार्यक्रम.येथील दर्डा मातोश्री सभागृहात कार्यक्रमाची सुरूवात गणेशवंदनेने झाली. सखी मंचची प्रार्थना विद्या बेहरे यांनी सादर केली. यावेळी स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर सर्वप्रथम ‘भूली बिसरी यादे’ ही गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक उज्वला नारिंगे, व्दितीय क्रमांक स्वप्नाली चौधरी, तृतीय सरला चिद्दरवार आणि चौथा क्रमांक नेहा वर्मा यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून लिना कळसपुरकर, दिपीका गंगमवार यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत राखी खत्री आणि सुनीता भोयर यांनी सखी मंचचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. रांगोळी स्पर्धेत सखींनी एकापेक्षा एक रांगोळ््या साकारल्या होत्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक दीपाली झोपाटे, व्दितीय भारतीय तुमसरे आणि तृतीय क्रमांक दीप्ती गव्हाणे यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून अश्विनी चौलवार, शिवाणी पालडीवाल यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत माणिक भोयर, स्मिता नागदिवे यांनी सखी मंचचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. ‘जरा चख कर देखो’ या मटरचे नमकीन व्यंजन तयार करण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक दिपा तम्मेवार, व्दितीय क्रमांक ज्योती गोल्हर, तृतीय क्रमांक सुनंदा राजगुरे यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून सुमन वर्मा, प्रेरणा बाजोरिया यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत दीपा लिंगावार, कविता लढ्ढ यांनी सखी मंचचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. ‘ओटी सजाओ’ स्पर्धेत प्रथम क्रमांक कविता लढ्ढा, व्दितीय क्रमांक राजश्री झाडोले यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून निता भुतडा आणि उषा मोर यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत जयश्री तांबोळी, नीलिमा शर्मा यांनी सखी मंचचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. ‘मोबाईल संस्कृतीचा मुलांवर होणारा परिणाम’ या विषयावरील भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक छाया राठी, व्दितीय उज्ज्वला नारिंगे, तृतीय क्रमांक मंदा बनकर यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून कविता तातेड, माला टाके यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत शुभदा हातगावकर, स्मिता गंधे यांनी सखी मंचचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. ‘जैसा देश वैसा भेस’ या थिमवर आधारित वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पना मांगुळकर यांनी, व्दितीय विद्या गोहोकार, तृतीय क्रमांक उज्वला नारिंगे यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून मनीषा पालतेवार, शालिनी राठी यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत पुष्पा पारसकर, नलिनी हांडे यांनी सखी मंचचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार गीफ्ट स्वरूपात लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांचे स्वागत छाया राठोड यांनी केले. या कार्यक्रमासाठी अलका राऊत, निलिमा मंत्री यांनी सहकार्य केले. (उपक्रम प्रतिनिधी)