शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जलयुक्त शिवारच्या कामांवर यंत्रणेचीच टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:27 IST

जलयुक्तशिवारच्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील मुख्य अडथळा यंत्रणेतील काम करणारा विभागच झाला आहे. ई टेंडरिंग होऊनही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.

ठळक मुद्देकामे रखडली : कोट्यवधींचा खर्च मातीमोल

ऑनलाईन लोकमतमहागाव : जलयुक्तशिवारच्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील मुख्य अडथळा यंत्रणेतील काम करणारा विभागच झाला आहे. ई टेंडरिंग होऊनही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही. तर दुसरीकडे या कामामुळे जलस्तर कुठेही वाढलेला दिसत नाही. त्यावरील कोट्यवधींचा खर्च मात्र मातीमोल झाला आहे.महागाव तालुक्यात झालेली ४२१ कामांपैकी अपवाद वगळता किती उपयुक्त ठरली, याचा शोध घेणे गरजेचे आहे. तीन-चार कामे एकत्र करुन ई-टेंडरला लावलेली कामे पूर्ण होऊ शकलेली नाही. या कामांबाबत वरिष्ठ गंभीर नसल्याने कोट्यवधींची कामे ठप्प आहे. गावोगाव कामांची मागणी असूनही यंत्रणेकडून कृती आराखड्यात घेण्यात आले नाही. यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे एरिया कमांडमध्ये सिंचन उपविभागातर्फे ६६ लाखांची कामे अंबोडा येथे करण्यात आली. हा भाग सिंचनाच्या कमांड एरियात येत असल्याने अन्य विभागाने येथे काम घेतले नाही, हे विशेष.गावकऱ्यांची मागणी असूनही तेथे काम सूचविण्यात आले नाही. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा ठपका ठेवत वन विभागाच्या तीन अधिकाºयांना महागाव तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सामाजिक वनीकरण विभागाने नोटीसला उत्तर पाठविले असून रोहयो आणि प्रादेशिक विभागाने अद्याप दखल घेतली नाही. तसाच अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. बाबासाहेब नगर, बोरी, दगडथर, धारेगाव, काळीटेंभी, कासारबेहळ, कासोळा, कातरवाडी, पेढी इजारा, पिंपरी इजारा, शीरमाळ, वाकद येथे जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. परंतु पाण्याचा स्तर उंचावला नाही. नेमकी याच परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यातील या गावांचा पाणी ताळेबंद बघितला असता त्यांना आठ हजार ७१४ सघमी पाण्याची आवश्यकता आहे. जलयुक्तच्या कामामुळे एक हजार ४५५ सघमी पाण्याचा अपधाव अडविण्यात आला आहे, असे असूनही पाणीटंचाई का, हा संशोधनाचा विषय आहे.चौकशी करणे गरजेचेसिंचन विभाग, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग, पंचायत समिती व अन्य यंत्रणेकडून करण्यात आलेली जलयुक्तची कामे तपासण्याची गरज आहे. यंत्रणेकडून ई टेंडर झालेली कामे सुरुच करण्यात आली नाही. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविता आले नाही. पर्यायाने तालुक्यात जलयुक्त शिवार योजना राबविताना अपयश आले आणि दुसरीकडे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.