शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

पदव्युत्तर जागा रद्दला शासनच जबाबदार

By admin | Updated: October 29, 2015 02:46 IST

रक्त विलगीकरण यंत्रणेच्या अभावाने पदव्युत्तर जागा गमावण्यास शासनच जबाबदार असल्याचा पलटवार

‘मेडिकल’च्या यंत्रणेचा पलटवार : रक्त विलगीकरण युनिटज्ञानेश्वर मुंदे यवतमाळरक्त विलगीकरण यंत्रणेच्या अभावाने पदव्युत्तर जागा गमावण्यास शासनच जबाबदार असल्याचा पलटवार येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उच्चपदस्थ यंत्रणेने केला आहे. स्थानिक पातळीवर सर्व तयारी असताना केवळ शासन दरबारी प्रस्ताव धूळ खात असल्याने रक्त विलगीकरण युनिट सुरू झाले नाही. याचा परिणाम पदव्युत्तर जागांसोबतच रुग्णसेवेवर होतो. ‘यवतमाळच्या मेडिकल कॉलेजने वाढीव पदव्युत्तर जागा गमावल्या’ अशा आशयाचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ उडाली. या संदर्भात येथील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वेगळेच वास्तव पुढे आले. रक्तातील विविध घटक वेगळे करणारे यंत्र २००८ पासून बंद आहे. रिको कंपनीचे हे यंत्र दुरुस्त करण्याचा खर्च मोठा असल्याने नवीन यंत्र खरेदी करण्याचा प्रस्ताव तेव्हापासूनचा आहे. यासाठी ‘मेडिकल’ने राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्रस्ताव पाठविला. त्यानंतर स्थानिक पातळीवर रक्तपेढीमध्ये आवश्यक ती तयारी दोन वर्षापूर्वीच करण्यात आली आहे. या ठिकाणी फर्निचर बसविण्यात आले आहे. फ्रीज लावण्यात आला आहे. वीज यंत्रणाही उभारण्यात आली आहे, अशी माहिती येथील उच्चपदस्थांनी दिली. मात्र रक्त संक्रमण परिषदेने खरेदीची प्रक्रियाच सुरू केली नाही. याबाबत तीन ते चारदा स्मरणपत्र देण्यात आले. तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयासोबतही पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच येथे वरिष्ठ तंत्रज्ञाचा प्रश्न कायम आहे. कमी वेतन मिळत असल्याने वरिष्ठ तंत्रज्ञ येथे येण्यास तयार नसल्याचे पुढे आले. आता मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या नव्या नियमानुसार पदव्युत्तर जागा वाढविण्यासाठी किंवा त्यांना मान्यता मिळविण्यासाठी रक्त विलगीकरण यंत्रणा असणे आवश्यक आहे. या युनिटमध्ये रेफ्रीजेरेटर सेन्ट्रीफ्युज मशीन, प्लाझ्मा एक्सेटर, लॅमिनर एअरफ्लो मशीनची आवश्यकता असते. ही सर्व मशिनरी केवळ ३० लाख रुपयांची आहे. परंतु राजकीय इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याचा अभाव यामुळे ही यंत्रणा खरेदी झाली नाही. राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे पाठविलेल्या प्रस्तावात क्षुल्लक त्रुट्या काढण्यात आल्या. युनिटच्या नकाशात टोपो निळा का असा सवाल करीत काळा टोपो लावावा म्हणून प्रस्ताव तीन वर्षापूर्वी परत आला. त्याच काळात निधीचाही प्रश्न निर्माण झाला. येथील महाविद्यालयातील सद्यस्थितीत असलेली रक्तपेढीची जागा विस्तारित करावी की नवीन रक्तपेढी बांधावी हा मुद्दा कळीचा झाला. आता एमसीआयने हाच मुद्दा पुढे केल्याने येथील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा गमावण्याची वेळ आली आहे. रुग्णसेवेला बसतो फटका १० घटक होतील वेगवेगळेवैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत असलेले अधिव्याख्याता, सहयोगी प्राध्यापक रुग्णांवर उपचाराच्या मानसिकतेत नसतात. अनेकांचे शहरात खासगी दवाखानेही आहे. परिणामी येथील रुग्णसेवाही पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या भरोश्यावरच सुरू असते. हे विद्यार्थी दीर्घ अनुभवासाठी रुग्णांवर उपचार करण्यासाठी एका पायावर तयार असतात. रात्री बे रात्री कधीही ते उपलब्ध होतात. आता रक्त विलगीकरण यंत्रणेमुळे वाढीव जागा कमी झाल्यास त्याचा फटका रुग्णसेवेला बसू शकतो. यवतमाळ हा आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. तसेच डेंग्यूचे ही अधिक रुग्ण असतात. अशा स्थितीत रुग्णांना रक्त पुरवठा करणे गरजेचे असते. सध्या रक्त विलगीकरण यंत्रणा नसल्याने एक बॅग रक्त एकाच रुग्णाला लावावी लागते. मात्र हे युनिट सुरू झाल्यास रक्तातील दहा घटक वेगवेगळे करता येईल. त्यामुळे एका रक्तदात्याचे रक्त एकापेक्षा अधिक रुग्णांना देता येईल. वेळेवर रक्त उपलब्धही होईल. तसेच उन्हाळ्यात मार्च ते जून महिन्यात रक्त कमी प्रमाणात उपलब्ध असते. या काळात एक रक्तदाता तीन ते चार जणांचे प्राण वाचवू शकते. यासाठी केवळ रक्त विलगीकरण यंत्रणा आवश्यक आहे. सध्या प्लाझ्मा किंवा पेशींची आवश्यकता भासली तर खासगी रक्त पेढीतून आणावे लागते. त्याचा आर्थिक भूर्दंड रुग्णांना बसतो.