शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

दुर्मिळ नाण्यांतून साकारले गणरायाचे मखर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:41 IST

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आकर्षक देखाव्यांसाठी प्रचंड मेहनत घेतातच. मात्र, एका गणेशभक्ताने आपल्या घरगुती गणेशासाठी केलेल्या मखराने या मंडळांनाही मागे टाकले आहे.

ठळक मुद्देजीएसटीचा खास संदेश : मोगल, ब्रिटिशकालीन नाण्यांचा संग्रह

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आकर्षक देखाव्यांसाठी प्रचंड मेहनत घेतातच. मात्र, एका गणेशभक्ताने आपल्या घरगुती गणेशासाठी केलेल्या मखराने या मंडळांनाही मागे टाकले आहे. तब्बल ५ हजार दुर्मिळ नाण्यांच्या संग्रहातून साकारलेले हे मखर सध्या यवतमाळात चर्चेचा विषय ठरत आहे.स्थानिक मारवाडी चौकातील सुमित हेमंत महेंद्रे यांच्या घरी गणेशोत्सवाचे ५१ वे वर्ष आहे. महेंद्रे यांनी १८५१ ते २०१७ पर्यंतचे विविध नाणे संग्रही केले. यंदा त्यातूनच गणरायाच्या मखराची निर्मिती केली. यामध्ये मोगलकालीन, शिवकालीन, ब्रिटिशकालीन, स्वातंत्र्योत्तर काळातील नाणे आणि सध्याची प्रचलीत नाणी यामध्ये वापरण्यात आली आहेत.यामध्ये अर्धा आणा, १ आणा, २ आणा, कत्तू, एक पैसा, २, ३, ५, १०, २५, ५० पैसे, १, २, ५, १० रूपयांची विविध रंगाची नाणी आहेत. पितळ, कासे, तांबे, जर्मन आणि चांदीच्या नाण्यांचा त्यामध्ये समावेश आहे. हे मखर तयार करण्यासाठी २० दिवस लागले.भक्तांना कर भरण्याचे आवाहनजीएसटीचा अर्थ अगदी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न सुमित महिंद्रे यांनी केला आहे. जी म्हणजे गणेश, एस म्हणजे संदेश आणि टी म्हणजे टॅक्स भरा असे सविस्तर विवरण त्यांनी लिहिले आहे. देश घडवायचे असेल तर जीएसटी भरलाच पाहिजे, असा उल्लेख त्यांनी केला आहे.मूर्तीला कलदाराचा आकारमहेंद्रे यांनी स्थापन केलेली मूर्तीही खास आहे. मातीच्या मूर्तीला कलदाराचा आकार देण्यात आला आहे. त्याचा संपूर्ण भाग रूपयाच्या डिझाईनने देखणा करण्यात आला आहे. यामुळे ही मूर्ती मातीची असेल असे पाहताक्षणी वाटतच नाही.