शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

ऐन हंगामात तुरीचे दर घसरल्याने शेतकरी हादरले

By admin | Updated: February 23, 2015 00:09 IST

कपाशी आणि सोयाबीनने दगा दिल्यावर एकमेव आशा असलेल्या तुरीचे दरही ऐन हंगामात घसरले आहे. क्ंिवटल मागे ५०० रुपयांची घसरण झाल्याने ...

यवतमाळ : कपाशी आणि सोयाबीनने दगा दिल्यावर एकमेव आशा असलेल्या तुरीचे दरही ऐन हंगामात घसरले आहे. क्ंिवटल मागे ५०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी चांगलेच हादरले असून यामागे व्यापाऱ्यांची नफेखोरी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. कापूस आणि सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून आठ लाख हेक्टरवर तूर होती. आधीच उशिरा झालेल्या पेरणीने तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाला. इतकेच नव्हे तर मध्यंतरी आलेल्या पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला. त्यामुळे तुरीचा बहर गळला होता. ओलिताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला. विविध संकटे झेलत शेतकऱ्यांची तूर काढणीला आली. एकरी एक ते दोन क्ंिवटल उतारा आला. त्यामुळे लावलागवडीचाही खर्च निघणे शक्य नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आपली तूर बाजारात नेली. सुरुवातीला तुरीचे दर चार हजार रुपये प्रति क्ंिवटलवरून सहा हजार ५०० रुपयापर्यंत वाढत गेले होते. त्यामुळे शेतकरी समाधानी होते. आणखी भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी तूर विकली नाही. मात्र काही दिवसातच ही स्थिती बदलली. गेल्या आठवड्यात तुरीच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली. म्हणायला दर ६ हजार रुपये क्ंिवटल असले तरी बहुतांश शेतकऱ्यांना ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० पर्यंतच दर मिळत आहे. बाजारात तुरीची कुठलीही आवक नाही. तुरीचे चांगले उत्पादन नाही. अशा स्थितीत तुरीचे दर का घसरले हा संशोधनाचा विषय आहे. या घसरणीमागे व्यापाऱ्यांची नफेखोरी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)