शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

निर्मनुष्य रस्ते आणि फटाक्यांची आतषबाजी

By admin | Updated: February 16, 2015 01:49 IST

रविवार बाजाराचा दिवस. एरव्ही रस्ते गर्दीने ओसंडून वाहतात. मात्र रविवारी सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट. कुणीही घराबाहेर पडायला तयार नाही.

यवतमाळ : रविवार बाजाराचा दिवस. एरव्ही रस्ते गर्दीने ओसंडून वाहतात. मात्र रविवारी सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट. कुणीही घराबाहेर पडायला तयार नाही. लग्नाची दाट तिथी असतानाही मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती. अशी अघोषित संचारबंदी रविवारी यवतमाळ शहराने अनुभवली. निमित्त होते, वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतीचे. भारताने फलंदाजीला सुरुवात केली. प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली. चौकार-षटकारांची फटकेबाजी होत असताना बाहेर फटाक्यांची आतषबाजी होत होती. तर पाकिस्तान संघ फलंदाजीसाठी उतरल्यानंतर प्रत्येक विकेटला शहरात फटाके फुटत होते. विजयाचा क्षण आला आणि यवतमाळ शहरासह जिल्ह्याने दुसऱ्यांदा दिवाळीचा अनुभव घेतला. चौकाचौकात फटाके फोडून पाकवर मिळविलेल्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात होता. क्रिकेट विश्वातील अत्यंत रोमहर्षक होणारा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी रंगला. लाखो प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी दोन दिवसांपासूनच तयारी चालविली होती. त्यातच रविवार हा सुटीचा दिवस आल्याने आनंदात आणखीच भर पडली. प्रत्येक जण घरातील दूरचित्रवाणी संचापुढे बसलेला होता. परिणामी रविवार हा बाजाराचा दिवस असतानाही यवतमाळ शहरातील रस्ते अगदी निर्मनुष्य होते. शहराचा दत्त चौक रविवारी सकाळपासूनच गजबजलेला असतो. मात्र या परिसरातही शुकशुकाट जाणवत होता. भाजीमंडईसह आठवडी बाजारातील कोलाहल शांतशांत वाटत होता. कुणीही घराबाहेर पडत नव्हते. शहरातील इतर भागांचीही अशीच अवस्था होती. अतिशय महत्वाच्या कामासाठीच बाहेर निघत होते. मात्र त्यांचेही मन क्रिकेटच्या मॅचमध्येच दिसत होते. कुठेही दुकानात दूरचित्रवाणी संच दिसला की तेथे डोकावून पाहत असल्याचे चित्र दिसत होते. रविवारी लग्नाची तिथी दाट होती. शहरातील प्रत्येक मंगल कार्यालय लग्नासाठी बुक होते. मात्र या ठिकाणीही अपेक्षित गर्दीच दिसत नव्हती. नवरदेवाच्या वरातीत नाचायलाही तरुण तयार नव्हते. महिला मंडळींचीच गर्दी आज निघालेल्या वरातीत दिसत होती. मंगल कार्यालयातही असाच काहीसा अनुभव येत होता. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान शहराच्या विविध भागातून फटाक्यांचे आवाज येत होते. ५ वाजता भारताने सामना जिंकला आणि शहरभर फटाक्याची एकच आतषबाजी झाली. प्रत्येक जण विजयाचा जल्लोष साजरा करीत होते. (नगर प्रतिनिधी)