शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ऊर्जामंत्र्यांचा पारा भडकला

By admin | Updated: May 2, 2015 23:57 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील वीज समस्यांचा पाढा ऐकून ऊर्जामंत्री आपल्या खात्याच्या वरिष्ठांवर जाम भडकले.

आढावा बैठक : यवतमाळची स्थिती विजेच्या संदर्भात गडचिरोलीपेक्षाही बिकटयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील वीज समस्यांचा पाढा ऐकून ऊर्जामंत्री आपल्या खात्याच्या वरिष्ठांवर जाम भडकले. विजेसंदर्भात प्रलंबित अलसेली कामे तत्काळ झाली नाही तर गडचिरोलीत पाठवू असा इशारा येथे आयोजित आढावा बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात शनिवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावाकुळे यांनी जिल्ह्यातील वीज समस्येचा आढावा घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश वरिष्ठांना दिले. यावेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार ख्वाजा बेग, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, वीज वितरण कंपनीचे संचालक (कृती) अभिजित देशपांडे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर उपस्थित होते. यावेळी धडक सिंचन विहिरींच्या सहा हजार ७५३ आणि कृषी पंपांच्या नऊ हजार ९१३ प्रलंबित वीज जोडणीचा प्रश्न बैठकीत चर्चेला आला. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही कोणत्याच उपाययोजना झाल्या नसल्याचे पुढे आले. त्यावरून ऊर्जामंत्री चांगलेच भडकले. शेतकऱ्यांना स्थानिक वृत्तपत्रातून माहिती दिल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले. त्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला. निष्काळजीपणाने काम करणे सोडून द्या, भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, खोटी माहिती दिली तर गोपनीय अहवाल बिघडवू असा गर्भित इशारा दिला. त्यावेळी वीज वितरणचे संचालक अभिजित देशपांडे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. दहा दिवसात शेतकऱ्यांना वीज जोडणीसंदर्भात पत्र पाठवू असे सांगितले. दहा दिवसात काम झाले नाही तर तुमच्यावरही कारवाई केली जाईल, असा दम त्यांनी संचालकांना भरला. रोहित्र बंद पडल्यावर लोकवर्गणी आणि वीज बिल भरुन घेतले जाते. त्यानंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर रोहित्र बसविले जाते, अशी माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी या बैठकीत दिली. त्यावर ऊर्जामंत्री पुन्हा संतप्त झाले. हा काय प्रकार आहे याची संचालकांकडे माहिती विचारली. मात्र पुरेशी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. जिल्ह्यात असा प्रकार घडला असेल तर शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करा, पैसे मागणे, बिल भरुन घेणे असे प्रकार असतील तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. फिडर व्यवस्थापनासाठी ग्रुप स्थापन केले जातात. यावर स्थानिक परिसरातील सेवानिवृत्त वीज अभियंता अथवा वीज अभियंत्याची पदवी घेतलेला युवक यांच्यासह आयटीआय झालेले बेरोजगार युवक यांचा समावेश राहणार आहे. फिडरच्या देखभाल दुरुस्तीसह परिसरात संपूर्ण सेवा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे. या माध्यमातून स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. शिवाय वीज चोरीला आळा घालण्यासाठी २५ टक्के इन्सेन्टीव्ह देण्यात येईल. आज एका फिडरवर महिन्याकाठी एक लाखापर्यंत खर्च होतात, असे ३१५ फिडर जिल्ह्यात कार्यरत आहेत. (शहर वार्ताहर)३१ मार्चपूर्वी जिल्हा भारनियमनमुक्त करू यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात २०५ गावात भारनियमन केले जाते. भारनियमन कमी करण्याची जबाबदारी वीज वितरणची आहे. तांत्रिक अडचणीमुळे भारनियमन होत आहे. यासमस्या सोडविण्याचा कधीही प्रयत्न झाला नाही. त्यामुळे सातत्याने भारनियमन होत आहे. ३१ मार्च २०१६ पूर्वी संपूर्ण जिल्हा भारनियमन करण्याचे निर्देश या बैठकीत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. वीज वितरणचे कामे अर्धवट टाकून पसार झालेल्या कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचे निर्देशही दिले आहे. यवतमाळ जिल्ह्यात आयव्हीआरसीएल आणि नागार्जुना या दोन कंपन्यांनी कामे अर्धवट टाकल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फिडर मॅनेजर योजना विजेसंदर्भात असलेले प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी वीज वितरण कंपनी फिडर मॅनेजर ही नवीन योजना कार्यान्वित करीत आहे. त्यासाठी सात तज्ज्ञ लोकांची चमू तयार केली जाईल. त्यात पाच आयटीआय पदविकाधारक, एक अभियंता आणि एक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश राहील. एका फिडरवरून चार हजार ग्राहकांना वीज दिली जाते. या फिडरवरील संपूर्ण प्रश्न सोडविण्याची जबाबदारी या चमूवर राहील. त्यात देखभाल, वीज बिल, रिडींग आणि इतर सेवांचा समावेश असेल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.