शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 21:51 IST

गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : अत्यल्प पाऊस, सोयाबीन, मूग, उडीदाचे उत्पन्न घटणार

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला. त्यातच सध्या मोठ्या प्रमाणात रोग आल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात सापडले आहे.आॅगस्ट महिना संपत आला तरी ३५१ मिमीच्या वर पाऊस पडला नाही. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे उत्पन्न ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. जूनमध्ये पेरण्या आटोपल्यानंतर या महिन्यात २०९ मिमी पाऊस कोसळल्याने पिकांची उगवण चांगली झाली. मात्र जुलैमध्ये प्रमाण घटून १११ मिमी पाऊस आला. त्यामुळे ऐन महत्त्वाच्या काळात पावसाने दगा दिल्याने पीक हिरवी दिसत असली तरी त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. पाऊस गायबच झाल्याने कोरडवाहू भागातील कापूस, सोयाबीन पिके सुकली आहे. मूग आणि उडीदाच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केवळ ३१५ मिमी पावसाची नोंद झाली. पाऊस यावेळी फारच कमी पडला आहे. कमी पावसामुळे नदी, नाले कोरडे पडले आहे. कोणत्याही प्रकल्पाने ५० टक्क्यापर्यंतही पातळी गाठली नाही. ६७.२५ दलघमी साठवण क्षमता असणाºया म्हसणी धरणात १९.८५ दलघमी पाणीसाठा आहे, तर पाथ्रड, कुंभारकिन्हीसह इतर छोट्या प्रकल्पाने तळ गाठला आहे. मुबलक पाऊस न पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. परिणामी विहिरी आटल्या. ओलिताची सोय असणाºया शेतकºयांच्या कपाशीची स्थिती चांगली असली तरी आता मात्र पाणी पुरत नाही. त्यामुळे पीक हिरवी दिसत असली तरी यावर्षी उत्पादनात घट होणार असं मानलं जात आहे. त्यामुळे शेतकºयांची काळजी पुन्हा एकदा वाढली आहे.पिकांवर रोगांचा प्रादुर्भावकमी पाऊस, प्रतिकूल वातावरण यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग आला आहे. सोयाबीनवर तर गेल्या दहा वर्षात पाहिली नाही एवढी अळी असल्याचे सांगण्यात येते. एका झाडावर २५ च्या वर अळ्या आढळतात. तर कपाशीवर फुलकिडा पांढरी माशी हा रोग आल्याने झाडांची स्थिती वाईट आहे. त्यामुळे कपाशी, सोयाबीन या पिकांची दुरावस्था झाली असून शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कमी पाऊस त्यातच पिकांवरील रोगामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असली तरी कृषी खात्याचे जिल्ह्यातील अधिकारी मात्र परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगत आहे.