शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
3
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
4
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
5
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
6
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
7
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
8
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
10
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
11
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
12
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
13
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
14
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
15
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
16
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
18
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
19
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
20
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन

जिल्हा बॅंकेतील ८९ लाखांचा अपहार, 4 निलंबितांवर अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 13:38 IST

जिल्हा बॅंकेतील अपहार ८९ लाखांचा : ऑडिटमध्ये आकडा आणखी वाढणार

आर्णी (यवतमाळ) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आर्णी शाखेतील ८९ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी अखेर बुधवारी रात्री उशिरा चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस आता या आरोपींच्या शोधात आहेत. आर्णी शाखेतील हा गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्याची दखल घेऊन निलंबन व एफआयआर करण्यात आला. आर्णी शाखेचे व्यवस्थापक रणजित मधुकर गिरी यांनी आर्णी पोलीस ठाण्यात ही फिर्याद नोंदविली. २०१८ पासून १२ मार्च २०२१ पर्यंत प्राथमिक लेखापरीक्षणात ८९ लाख २७ हजार ५०१ रुपयांची अफरातफर झाल्याचे नमूद करण्यात आले.

त्यावरून भादंवि ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७७ व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. त्यात आर्णी शाखेच्या व्यवस्थापक योगीता सुनील पुसनायके (४५) रा. यवतमाळ, लेखापाल अमोल पांडुरंग मुजमुले (४३) रा. जवळा ता. आर्णी, रोखपाल विजय खुशालराव गवई (५२) रा. यवतमाळ व अंकित दीपक मिरासे (३५) रा. सुकळी ता. आर्णी यांना आरोपी बनविण्यात आले आहे. विशेष असे गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर संचालक मंडळाने तिघांना तडकाफडकी निलंबित केले होते. तर कंत्राटी असलेल्या अंकितची सेवा समाप्त केली होती. या आरोपींनी संगनमताने २५ ग्राहकांच्या बॅंक खात्यातून रक्कम काढणे, त्यासाठी विड्रॉल स्लीप, चेक स्लीप याच्यावर खाडाखोड करणे, खोटे दस्तावेज तयार करणे, ते खरे म्हणून वापरणे, ग्राहकांच्या बचत खाते पुस्तकावर स्व:हस्ते एन्ट्री करून खोटे हिशेब तयार करणे, बॅंकेची फसवणूक करून न्यायभंग करणे, बॅंकेच्या खातेधारकांना ठगविणे आदी ठपका पोलिसातील तक्रारीत ठेवण्यात आला आहे. महिला सहायक फौजदार अलकनंदा काळे यांनी ही फिर्याद नोंदवून घेतली असून आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव या गुन्ह्याचा तपास करीत आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.

ऑडिटच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षाआर्णी शाखेतील फिर्याद ही तूर्त ८९ लाखांची देण्यात आली असली तरी लेखापरीक्षणाच्या अंतिम अहवालात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी आपली रक्कम बॅंक खात्यात सुरक्षित आहे की नाही हे तपासणीसाठी तीन दिवसांपासून आर्णी शाखेत गर्दी केली आहे.

जिल्हा बॅंक अध्यक्षांनी शब्द पाळलाकोणत्याही परिस्थितीत एफआयआर होणारच अशी भूमिका जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी घेतली होती. हा शब्द अखेर त्यांनी खरा करून दाखविला. गुन्हे दाखल व्हावे म्हणून मंगळवारी त्यांनी काही संचालकांसह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांचीही भेट घेतली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ